सांगली: बलवडीत १०४ जर्शी गायींची खोंडे कत्तलीसाठी नेताना पकडली

विटा : पुढारी वृत्तसेवा : बलवडी येथे १५ दिवसांच्या वयाची १०४ जर्शी गायीची जिवंत आणि मृत दोन खोंडे पिकअप गाडीतून कत्तलीसाठी नेत असताना विटा पोलिसांनी पकडली. याप्रकरणी मिरज येथील रम जान इसरार मणियार (वय २०), मुशोद्दीन बेपारी (रा.मोमीन गल्ली, शहा डोंगरी मज्जिद जवळ) तसेच बलवडीतील मनोहर पाटील आणि करण तुपे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला …

सांगली: बलवडीत १०४ जर्शी गायींची खोंडे कत्तलीसाठी नेताना पकडली

विटा : Bharat Live News Media वृत्तसेवा : बलवडी येथे १५ दिवसांच्या वयाची १०४ जर्शी गायीची जिवंत आणि मृत दोन खोंडे पिकअप गाडीतून कत्तलीसाठी नेत असताना विटा पोलिसांनी पकडली. याप्रकरणी मिरज येथील रम जान इसरार मणियार (वय २०), मुशोद्दीन बेपारी (रा.मोमीन गल्ली, शहा डोंगरी मज्जिद जवळ) तसेच बलवडीतील मनोहर पाटील आणि करण तुपे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास बलवडी फाटा ते विटा जाणारे रस्त्यावर बलवडी विकास सोसायटी समोर एक पिकअप गाडी (एमएच.१० बीआर ०४४१) जात होती. त्यात  १५ ते २० दिवस वयाची ४२ लहान जर्शी खोंडे तोंडाला व पायाला दोरीने दाटीवाटीने घट्ट बांधलेली आढळून आली.
तसेच बलवडी फाटा ते पलूस जाणाऱ्या जुना सातारा रस्त्यालगत असलेल्या मनोहर पाटील यांच्या गोठयात १५ दिवस वयाची आणखी ६२ जिवंत आणि २ मृत जर्शी खोंड कत्तलीसाठी नेण्यासाठी दलाल करण तुपे याने एकत्र ठेवली होती. विटा पोलिसांनी संशयित रमजान मणियार आणि त्याचा साथीदार तसेच मुशोद्दीन बेपारी, मनोहर पाटील आणि करण तुपे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पलूसचे डॉ. विशाल पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
हेही वाचा 

सांगली : ‘सरकारने मराठ्यांच्या सगेसोयरे आरक्षणाचा निर्णय घेऊ नये’
सांगली: विटा येथील यंत्रमाग आठवड्यातील तीन दिवस बंद राहणार
टसांगली : आटपाडी, तासगावात जोरदार पाऊस