प्रा.शाम पाटील
मुदाळतिट्टा: शैक्षणिक संस्था मधील मादक द्रव्यांमुळे मानवी जीवनाच्या होणाऱ्या शोषणाबाबत जागरूकता आणण्यासाठी शाळांमधून प्रहारी क्लबची (Prahari Group) निर्मिती करण्यात येणार आहे. या क्लबना मादक द्रव्यांच्या आहारी गेलेल्या अथवा जाऊ शकतील, अशा मुलांवर लक्ष ठेवणे. शैक्षणिक संस्थेच्या परिसरातील मादक द्रव्य तस्करीस आळा घालण्याची जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांना परावृत्त करता येणार आहे.
प्रहारी क्लबमध्ये एकूण २० ते २५ मुलांचा समावेश
प्रहारी क्लबमध्ये सहावी ते बारावी वर्गातील एकूण २० ते २५ मुलांचा समावेश करण्यात येणार आहे. या क्लबमधील सदस्य मादक द्रव्य हाताळणी व सेवन याबाबत संशयित विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवतील आणि याबाबतची गोपनीय माहिती कल्ब मध्ये नियुक्त केलेल्या शिक्षकांना देतील. गांधी स्मृती आणि दर्शन समितीमार्फत या प्रहारी क्लब मधील विद्यार्थी सदस्यांना गांधीजींचे तत्वज्ञान, विचार आणि मादक द्रव्यांचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करतील. (Prahari Group)
Prahari Group: मादक द्रव्य प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये पालकांची भूमिका
मादक द्रव्य प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असून शाळा व्यवस्थापन समितीने त्यांच्या बैठकीमध्ये तसेच पालक शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करून जागरूकता आणावी. तंबाखू मुक्त शिक्षण संस्था या उपक्रमामध्ये तंबाखू सेवन प्रतिबंधासाठी देण्यात आलेल्या सूचनांची शैक्षणिक संस्थेच्या आवारामध्ये अंमलबजावणी करण्यात यावी. शैक्षणिक संस्थेच्या आवारात 100 मीटर परिसरात तंबाखू व इतर मादक द्रव्य तसेच मध्य विक्री प्रतिबंध घातला जाईल, याची दक्षता घेण्यात येणार आहे.
सहावी ते बारावीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत प्रहारी क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या शाळांमधून याची अंमलबजावणी केली जाईल, याची दक्षता घेण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी करावयाचे आहे.
Prahari Group :विवरणपत्र प्रत्येक चार माहिन्यांनी सादर करणे शाळांना बंधनकारक
इको क्लब, सांस्कृतिक क्लब, राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काऊट अँड गाईड, अशा कृती गटामार्फत कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरित करावे लागणार आहे. प्रहारी क्लब ची स्थापना प्रत्यक्षात कार्यान्वित यशस्विता विविध जनजागृती कार्यक्रमाचे छायाचित्र, यशस्वी घटनांच्या बाबतीची माहिती संकलित करून वरिष्ठ कार्यालयास वेळोवेळी देण्यात येणाऱ्या विवरणपत्रात प्रत्येक चार माहिन्यांनी सादर करणे, शाळांना बंधनकारक राहणार आहे.
बालकांमध्ये ड्रग्स आणि मादक पदार्थांचा प्रसार आणि अवैध तस्करी प्रतिबंध या विषयावर एक संयुक्त कृती आराखड्याच्या अंमलबजावणी साठी अनुपालन अधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली आहेत केंद्र ( केंद्रप्रमुख) शिक्षण अधिकारी नगरपालिका महानगरपालिका (प्रशासन अधिकारी) तालुका स्तर गटशिक्षणाधिकारी (अधीक्षक) शिक्षण अधिकारी माध्यमिक (उपशिक्षणाधिकारी माध्यमिक), विभागीय शिक्षण संचालक (सहाय्यक संचालक)
माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचनालय पुणे( प्रशासन अधिकारी) विद्यार्थी विकास, शिक्षण आयुक्तालय पुणे (प्रशासन अधिकारी) अशा कार्यालयीन स्तरावर नोडल अधिकारी व समन्वय अधिकारी यांच्यामार्फत लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
प्रहारी गटाची उभारणी शाळांना बंधनकारक
अपघातांचे वाढते प्रमाण हे शाळा स्तरावरील विद्यार्थ्यांचे असून सर्वसाधारणपणे मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून मोबाईल फोन व अंमली पदार्थांच्या सेवनापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी शासनाने उचलेले हे पाऊल कौतुकास्पद आहेत. सहावी ते बारावी पर्यंतच्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये प्रहारी गटांची स्थापना करणे बंधनकारक असून अंमलबजावणी करावी लागणार आहे.
– अजय पाटील, उपशिक्षणाधिकारी, कोल्हापूर
हेही वाचा
कोल्हापूर : शिरढोण येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; २ जण गंभीर जखमी
कोल्हापूर: ‘बिद्री’च्या इथेनॉल प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
कोल्हापूर : कुस्तीपटू गौरी पुजारी हिचे निधन