काळेगाव येथे कुलरचा शॉक लागल्याने दोन चिमुकलींची मृत्यू
अकोला, Bharat Live News Media वृत्तसेवा : अकोला येथील काळेगावात (ता. तेल्हारा) उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे गेलेल्या दोन चिमुकल्या मुलींना कुलरचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरातील गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काळेगाव येथे मामाच्या गावी गेलेल्या दोन मुलींचा सुट्टीसाठी गेल्या होत्या. त्या खेळत असताना त्यांचा अचानक कुलरला स्पर्श झाल्याने त्यांना विजेच्या धक्का लागला. या धक्यांमध्ये इशाली प्रवीण ढोले (वय.5) आणि प्रियांशी सोपान मेतकर (वय.5) अशी मृत मुलींची नावे आहेत. चालू वर्षी उन्हाळ्यामध्ये मागील दीड महिन्यात चार ते पाच जणांचा कुलरचा शॉक लागून मृत्यु झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
हेही वाचा :
विरारमध्ये झाड पडून महिलेचा मृत्यू; दोन दिवसांनी आढळला बेपत्ता वृद्धेचा मृतदेह
Hajj Yatra 2024 : हज यात्रेदरम्यान 98 भारतीयांचा मृत्यू
नागपूर : माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या पुरस्काराचे वितरण