आत्मसमर्पण करणाऱ्या गिरीधरला नक्षल्यांनी संबोधले ‘भगोडा’

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: नक्षल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी संगीतासह  शनिवारी (दि. २२) जूनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षल्यांच्या पश्चिम सबझोजनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे. श्रीनिवासने गिरीधरला ‘भगोडा’ म्हटले असून, त्याला जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे. गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत गिरीधरचे …

आत्मसमर्पण करणाऱ्या गिरीधरला नक्षल्यांनी संबोधले ‘भगोडा’

गडचिरोली, Bharat Live News Media वृत्तसेवा: नक्षल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी संगीतासह  शनिवारी (दि. २२) जूनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षल्यांच्या पश्चिम सबझोजनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे. श्रीनिवासने गिरीधरला ‘भगोडा’ म्हटले असून, त्याला जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.
गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत गिरीधरचे पत्नीसह आत्मसमर्पण
शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने त्याच्या पत्नीसह आत्मसमर्पण केले. यावेळी फडणवीस यांनी गिरीधर हा गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल चळवळीतील शेवटचा नेता होता. त्याच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचे म्हटले होते. यासंदर्भात नक्षल्यांचा प्रवक्ता श्रीनिवासने एक पत्रक जारी केले आहे.
गिरीधरची भयभीत होऊन पोलिसांपुढे शरणागती : श्रीनिवास
श्रीनिवासने पत्रकात म्हटले आहे की, गिरीधर आणि त्याची पत्नी ४ जूनलाच माओवादी कम्युनिस्ट पक्षातून कुणालाही न सांगता पोलिसांकडे पळून गेले. गिरीधर मागील २८, तर संगीता ही २३ वर्षांपासून नक्षल चळवळीत कार्यरत होती. १९९६ मध्ये गिरीधर नक्षल चळवळीत सहभागी झाल्यापासून वेगवेगळ्या पदांवर जाऊन त्याने दंडकारण्‌यातील उच्च पद प्राप्त केले. परंतु अलीकडे पोलिसांनी अनेक नक्षल नेत्यांना ठार केल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट पक्षाला नानाविध अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. या अडथळ्यांना समर्थपणे तोंड देण्याऐवजी गिरीधरने भयभीत होऊन पोलिसांपुढे शरणागती पत्करली, अशी टीकाही प्रवक्ता श्रीनिवास याने केली आहे.
दिवंगत नक्षल नेते पेद्दीशंकर, जोगन्ना, मल्लेश, नर्मदाक्का, सृजनक्का, विकास, भास्कर, संजय, विनू, इंदिरा, वासू यांच्या कार्याचा उल्लेख करुन श्रीनिवास याने गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल आंदोलनाच्या ४४ वर्षांच्या इतिहासात चळवळ सोडून पळणारा गिरीधर हा पहिलाही नाही आणि शेवटचाही नसेल, असे म्हटले आहे.
श्रीनिवासची धमकी निराशेतून: पोलिस अधीक्षक नीलोत्पल
गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांच्या अनेक म्होरक्यांना यमसदनी पाठवले आहे. शिवाय अनेक नक्षली राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेवर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत. यामुळे शिल्लक असलेल्या नक्षल नेत्यांमध्ये प्रचंड निराशा निर्माण झाली आहे. या निराशेतूनच ते आत्मसमर्पणाच्या तयारीत असलेल्या नक्षल्यांना धमकावत आहेत, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी श्रीनिवासच्या पत्रकावर प्रतिक्रिया देताना म्हटले.
हेही वाचा 

गडचिरोलीत ‘रोहयो’च्या कामात गैरप्रकार; युवक काँग्रेसचा आरोप
गडचिरोली : चार दिवसापूर्वी लग्न झालेल्या तरूणांसह आणखी एकाचा धबधब्यात बुडून मृत्यू
गडचिरोली: कोरची तालुक्यात हिवतापाचा उद्रेक सुरुच; आणखी एका बालिकेचा मृत्यू