कुठे आहेत राहुल गांधी? विषारी दारु प्रकरणी सीतारामण यांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तामिळनाडूमधील विषारी दारु प्रकरणी आतापर्यंत ५६ जणांचा मृत्‍यू झाला आहे. अनेकांवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आज (दि.२३) केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी काँग्रेसवर जोरदार हल्‍लाबोल केला. राहुल गांधी यांनी मौन बाळगले आहे.. ‘एएनआय’शी बोलताना निर्मला सीतारामण म्‍हणाल्‍या की, तामिळनाडूमध्ये विषारी दारू प्यायल्याने मृतांची संख्‍या ५६ जणांचा मृत्‍यू झाला आहे. रुग्णालयात दाखल …

कुठे आहेत राहुल गांधी? विषारी दारु प्रकरणी सीतारामण यांचा सवाल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : तामिळनाडूमधील विषारी दारु प्रकरणी आतापर्यंत ५६ जणांचा मृत्‍यू झाला आहे. अनेकांवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आज (दि.२३) केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी काँग्रेसवर जोरदार हल्‍लाबोल केला.
राहुल गांधी यांनी मौन बाळगले आहे..
‘एएनआय’शी बोलताना निर्मला सीतारामण म्‍हणाल्‍या की, तामिळनाडूमध्ये विषारी दारू प्यायल्याने मृतांची संख्‍या ५६ जणांचा मृत्‍यू झाला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या 200 हून अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये बहुतांश अनुसूचित जातीचे आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने एक शब्दही बोलला नाही. राज्यात विषारी दारू प्यायल्याने अनेक अनुसूचित जातीचे लोक मरण पावले आणि राहुल गांधी यांनी मौन बाळगले आहे. निर्मला सीतारामन यांनी या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘ज्या राज्यात दारू विक्रीसाठी सरकारकडून दुकानांना परवाने दिले जातात, त्याच राज्यातील कल्लाकुरी शहरात विषारी दारू तयार केली जाते. अखेर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी कुठे आहेत?, असा सवालही त्‍यांनी यावेळी केला.

#WATCH | Delhi: On Tamil Nadu hooch tragedy, Union Finance Minister Nirmala Sitharaman says, “More than 200 people are still in hospital in a critical stage. 56 people have died and most of them are from the scheduled caste… I condemn the incident. I am shocked that the… pic.twitter.com/06pvLqu6gC
— ANI (@ANI) June 23, 2024

आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू
तामिळनाडूतील कल्लाकुरी शहरात १९ जून रोजी विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांची संख्या ५६ वर पोहोचली आहे. विषारी दारू प्यायल्याने प्रकृती बिघडलेल्‍या २१६ जणांना तामिळनाडूतील चार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, पुद्दुचेरी येथे दाखल झालेल्या 3 रुग्णांना मृत घोषित करण्यात आले. कल्लाकुर्ची मेडिकल कॉलेजमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. येथे दाखल 31 रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर सालेम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालेल्या 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : 

NEET-UG Row : नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्‍नीक घेतले श्री अंबादेवी व एकवीरा देवीचे दर्शन