कला शाखेला कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी: प्राध्यापकांवर अतिरिक्तची टांगती तलवार

कासारवाडी: दहावीचा निकाल लागून अकरावीचे प्रवेश सुरू झाले यामध्ये वाणिज्य, विज्ञान शाखाकडे मुलांचा कल अधिक असून कला (आर्ट्स) शाखेला विद्यार्थी मिळेनात यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुकड्या कमी होण्याच्या भीतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार असल्याने दहावी पास मुलांची प्रवेशासाठी रस्सीखेच चालू आहे. Summary अकरावीला वाणिज्य, विज्ञान शाखाकडे मुलांचा कल कला (आर्ट्स) शाखेला विद्यार्थी …

कला शाखेला कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी: प्राध्यापकांवर अतिरिक्तची टांगती तलवार

उत्तम वडिंगेकर

कासारवाडी: दहावीचा निकाल लागून अकरावीचे प्रवेश सुरू झाले यामध्ये वाणिज्य, विज्ञान शाखाकडे मुलांचा कल अधिक असून कला (आर्ट्स) शाखेला विद्यार्थी मिळेनात यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुकड्या कमी होण्याच्या भीतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार असल्याने दहावी पास मुलांची प्रवेशासाठी रस्सीखेच चालू आहे.
Summary

अकरावीला वाणिज्य, विज्ञान शाखाकडे मुलांचा कल
कला (आर्ट्स) शाखेला विद्यार्थी मिळेनात
कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुकड्या कमी होण्याच्या भीती
प्राध्यापकांच्यावर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार

कला शाखेतून अकरावीचे बारावीचे व पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नोकरीची खात्री नाही. त्यामुळे अकरावी विज्ञान शाखेला अधिकाधिक प्रवेश होत आहेत. कला शाखेचे कॉलेज आणि तुकड्या विद्यार्थी संख्येअभावी मोडत असल्याने यावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्यावर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. यासाठी पट पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक, संस्थापक प्रयत्न करत आहेत. मुलांना आपल्याकडे कसे खेचता येईल यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. पेठवडगाव, पारगाव, वारणा, हातकणंगले, इचलकरंजी परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तर कला शाखेसाठी मुलांची रस्सीखेच चालू आहे. दाखले मिळवून पट टिकवण्यासाठी काही कॉलेजांचा आटापिटा सुरू आहे.
सर्वसाधारणपणे ८० ते ९० टक्केवारीच्या विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान शाखेकडे दिसून येतो. पण ५० ते ६० टक्के गुण मिळविणाऱ्यां विद्यार्थ्यांनाही कांहीं कॉलेज विज्ञान शाखेला प्रवेश देत आहेत. त्यामुळे नुकत्याच लागलेल्या दहावी शालांत परीक्षेच्या निकालानंतर कला शाखेसाठी कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी, असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.
 ५० टक्क्यालाही विज्ञान शाखेत प्रवेश
५० ते ६० टक्के गुण मिळविणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घेत आहेत. त्यामुळे भवितव्याच्या दृष्टीने आज कला शाखेपेक्षा विज्ञान शाखेलाच अधिक महत्व दिले जात आहे.
दहावीला गुणांची वाढ
दहावीच्या परीक्षेत अंतर्गत वीस गुण शिवाय अनेक परीक्षा केंद्रावर होणारी मदत यामुळे सामान्य मुलांच्या टक्केवारीत वाढ होते वाढ झालेल्या विद्यार्थी हा विज्ञान शाखेकडेच वळताना दिसत आहे.
शासनाने विनाअनुदानित तत्त्वावर ग्रामीण भागात अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना परवानगी दिलेली आहे. काही विज्ञान शाखेचे कॉलेजेस मुलांना प्रवेश घेताना वेगवेगळी प्रलोभने दाखवतात.
– प्रा. उमेश वांगधरे, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर
हेही वाचा 

कोल्हापूर : शिरढोण येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; २ जण गंभीर जखमी
कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या चरणी प्रश्नांचे साकडे
कोल्हापूर: ‘बिद्री’च्या इथेनॉल प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड