कोल्हापूर : शिरढोण येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; २ जखमी

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : शिरढोण (ता.शिरोळ) येथे गुलमोहर हॉटेलजवळ टेम्पोला ओव्हरटेक करताना दोन दुचाकींची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (दि.२३) सकाळी ११ च्या सुमारास झाला. सलिम समशेर इचलकरंजे (वय ४९, रा. आलास, ता. शिरोळ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर साहेरा …

कोल्हापूर : शिरढोण येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; २ जखमी

कुरुंदवाड : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिरढोण (ता.शिरोळ) येथे गुलमोहर हॉटेलजवळ टेम्पोला ओव्हरटेक करताना दोन दुचाकींची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (दि.२३) सकाळी ११ च्या सुमारास झाला. सलिम समशेर इचलकरंजे (वय ४९, रा. आलास, ता. शिरोळ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर साहेरा सलीम इचलकरंजे, फारूक कादर शेख (रा. इचलकरंजी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सलिम इचलकरंजे हा दुचाकीवरून (एम.एच.09 इ.जे 7788) वरून इचलकरंजीकडे पत्नी साहेरा इचलकरंजे यांना घेऊन जात होते. तर फारूक शेख हा आपल्या दुचाकीवरून (एम.एच.09, सी. वाय 7090) इचलजरंजीहून कुरुंदवाडकडे जात होते. यावेळी गुलमोहर हॉटेलजवळ इचलकरंजे हा टेम्पोला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या शेख यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने इचलकरंजे यांचे जमिनीवर डोके आपटल्याने ते जागीच ठार झाले. तर पत्नी साहेरा आणि शेख हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा 

कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या चरणी प्रश्नांचे साकडे
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा आज ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर: ‘बिद्री’च्या इथेनॉल प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड