वाशिम: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटून अपघात; २ महिला जखमी

वाशिम: पुढारी वृत्तसेवा: समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक 175 जवळ कारचा टायर फुटून दोन महिला जखमी झाल्या. ही अपघात आज (दि.23) दुपारी दीडच्या सुमारास झाला. जखमी महिलांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. शरयू नागरे (वय 28), मेघाताई नागरे (वय 48) असे जखमी महिलांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, श्री संत गजानन महाराज …

वाशिम: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटून अपघात; २ महिला जखमी

वाशिम: Bharat Live News Media वृत्तसेवा: समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक 175 जवळ कारचा टायर फुटून दोन महिला जखमी झाल्या. ही अपघात आज (दि.23) दुपारी दीडच्या सुमारास झाला. जखमी महिलांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. शरयू नागरे (वय 28), मेघाताई नागरे (वय 48) असे जखमी महिलांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्री संत गजानन महाराज शेगाव येथून दर्शन करून समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जात असताना कारचा (एम एच 31 एफ इ 98 20) समृद्धी महामार्ग लोकेशन 175 वर टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच लोकेशन 108 वरून समृद्धी महामार्ग पायलट आतिश चव्हाण, डॉ. सोहेल खान व जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिका सेवेचे नितीन पाटील, श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. परंतु, पुढील उपचारासाठी अमरावतीला त्यांना हलविण्यात आले.
हेही वाचा 

वाशिम : लोणी बुद्रुक येथील तरूणाने गळफास घेऊन संपविले जीवन
 वाशिम: डोक्यात फावडे मारल्याने गंभीर जखमी शेतकऱ्याचा मृत्यू
 वाशिम: मोहगव्हान येथील दारू अड्डा उद्ध्वस्त: ५ लाखांचा मुद्देमाल जप्त