पुणे: सहजपूर फाटा येथे बस झाडावर आदळली; वारकऱ्यांसह ३० प्रवासी जखमी

यवत, पुढारी वृत्तसेवा: पंढरपूरवरून पुण्याला जाणारी एसटी बस झाडावर धडकून भीषण अपघात झाला. यात  २५ ते ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. यात काही वारकऱ्यांचा देखील समावेश आहे. हा अपघात आज (दि.२३) दुपारी १२ च्या सुमारास पुणे- सोलापूर महामार्गावर सहजपूर फाटा (ता. दौंड) येथे झाला.  जखमींना उरली कांचन आणि लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले …

पुणे: सहजपूर फाटा येथे बस झाडावर आदळली; वारकऱ्यांसह ३० प्रवासी जखमी

यवत, Bharat Live News Media वृत्तसेवा: पंढरपूरवरून पुण्याला जाणारी एसटी बस झाडावर धडकून भीषण अपघात झाला. यात  २५ ते ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. यात काही वारकऱ्यांचा देखील समावेश आहे. हा अपघात आज (दि.२३) दुपारी १२ च्या सुमारास पुणे- सोलापूर महामार्गावर सहजपूर फाटा (ता. दौंड) येथे झाला.  जखमींना उरली कांचन आणि लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२ च्या सुमारास पंढरपूरवरून पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या एसटी बसला  (एमएच 40 एन 9519) पुणे – सोलापूर महामार्गावर सहजपूर फाटा (ता दौंड) येथे अपघात झाला. ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला चुकवताना  एसटीवरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या झाडावर जाऊन आदळली.
या बसमधून आषाढी वारीसाठी पंढरपूरवरून आळंदी आणि देहूला जाणारे काही वारकरी प्रवास करत होते. या अपघातात  २० ते २५ प्रवासी जखमी झाले. तर  एक प्रवाशी गंभीर जखमी आहे. जखमींना उरली कांचन आणि लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे
या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना मिळताच पोलीस हवालदार संदीप देवकर जायभय  घटनास्थळी दाखल झाले.  यावेळी यवत येथील श्री दत्त ट्रान्सपोर्टचे संदीप दोरगे व उरली कांचनचे वैभव कदम यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.  पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

#WATCH | Pune, Maharashtra: 20 to 22 passengers were injured after a state transport bus rammed into a tree near Sahajpur Phata in Yavat village. 2 to 3 passengers received serious injuries and have been rushed to the hospital: Narayan Deshmukh, Police Inspector, Yavat, Police… pic.twitter.com/9rONGHIgqI
— ANI (@ANI) June 23, 2024

हेही वाचा 

पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस गाड्या २८ ते ३० जूनपर्यंत रद्द

 पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : हायकोर्टाने निर्णय ठेवला राखून
पुणे : खेड शिवापूर येथील कंकू पेंट्स कंपनीला आग; लाखोचे नुकसान