चंद्रपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सत्कार कार्यक्रमात नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी आरक्षणातील फेरफाराला तीव्र विरोध दर्शवला. “कुठल्याही समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, पण आरक्षण देताना ओबीसीतून कुणाला आरक्षण देवू नका. आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसी स्वस्थ बसणार नाही; खांद्याला खांदा लावून मी पण रस्त्यावर उतरेन,” असा इशारा त्यांनी दिला आहे. नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा नागरी सत्कार नुकताच चंद्रपुरात पार पडला, यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
या कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, आमदार सुधाकर अडबाले, महासचिव सचिन राजूरकर आणि ओबीसी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अनुसूचित जाती, अनु, जमाती व अल्पसंख्याक संघटना आणि इतर सामाजिक संघटनांच्या वतीने खासदार धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले असताना, धानोरकर यांची भूमिका ओबीसी समाजाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतले श्री अंबादेवी व एकवीरा देवीचे दर्शन
लोकसभेतील पराभवानंतर मायावतींचा मोठा निर्णय, उत्तराधिकारी नेमला
18th Lok Sabha Session: 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू