‘या’ डाळी आहेत प्रोटिन्सचा खजिना

शरीरातील प्रोटिन्स म्हणजेच प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी आपल्या आहारात डाळींचा समावेश करणे आवश्यक आहे. डाळी हा प्रथिनांचा प्रमुख स्रोत आहे. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी, जे मांस आणि मासे खात नाहीत, त्यांच्या आहारात कडधान्यांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रथिनांसह, डाळींमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजेदेखील असतात, जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. डाळीच्या सेवनाने शरीरातील स्नायू, हाडे आणि त्वचेचे …

‘या’ डाळी आहेत प्रोटिन्सचा खजिना

शरीरातील प्रोटिन्स म्हणजेच प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी आपल्या आहारात डाळींचा समावेश करणे आवश्यक आहे. डाळी हा प्रथिनांचा प्रमुख स्रोत आहे. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी, जे मांस आणि मासे खात नाहीत, त्यांच्या आहारात कडधान्यांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रथिनांसह, डाळींमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजेदेखील असतात, जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. डाळीच्या सेवनाने शरीरातील स्नायू, हाडे आणि त्वचेचे आरोग्यही चांगले राहते. या डाळी प्रोटिन्सचा खजिनाच असतात.
सोयाबीन
सोयाबीन खाणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामध्ये प्रथिने तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
लाल मसूर
मसूर डाळीमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. ती वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरली जाते.
राजमा
राजमा भात हा जवळजवळ प्रत्येकाचा आवडता पदार्थ आहे. या ‘किडनी बीन्स’ खाण्याचे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत. कारण, ते प्रोटीनचा खूप चांगला स्रोत आहे.
हरभरा
चणाडाळ म्हणजेच हरभर्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सॅलड्स, सूप आणि करी यासारख्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हरभरा वापरला जाऊ शकतो.
उडीदडाळ
उडीदडाळ भातासोबत खायला अनेकांना आवडते. हे मुख्यतः दुपारच्या जेवणाच्या वेळी केले जाते. उडिदाच्या डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाणही चांगले असते आणि ते उच्च प्रथिन स्रोत म्हणून ओळखले जाते.
मूगडाळ
मूगडाळ ही प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे. ती खाल्ल्याने तुमच्या शरीराला आवश्यक प्रोटिन्स मिळू शकते. मूगडाळ किंवा खिचडी म्हणून तयार करून खाऊ शकता.
तूरडाळ
तूरडाळ आणि भात हे अनेक लोकांचे आवडते जेवण आहे. डाळीमध्ये प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटकदेखील असतात. ही डाळ खाल्ल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून आपला बचाव होतो.
हेही वाचा 

मनावरील ताण कमी करण्यासाठी ‘हे’ करा!
रिंगरोडबरोबरच विकासही मंदावला; प्रशासनाची ढिलाई कारणीभूत
पांढर्‍या शिधापत्रिकाधारकांना 5 लाखांचे आरोग्य कवच