नितीन गडकरींनी घेतले श्री अंबादेवी व एकवीरा देवीचे दर्शन

अमरावती, पुढारी वृत्तसेवा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आज (रविवार) अमरावती दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सपत्नीक विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले. संस्थानच्यावतीने केंद्रीय मंत्री गडकरी तसेच त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रविण पोटे-पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित …

नितीन गडकरींनी घेतले श्री अंबादेवी व एकवीरा देवीचे दर्शन

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आज (रविवार) अमरावती दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सपत्नीक विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले. संस्थानच्यावतीने केंद्रीय मंत्री गडकरी तसेच त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रविण पोटे-पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री अंबादेवी संस्थानचे अध्यक्ष विद्या देशपांडे, सचिव रवींद्र कर्वे, विश्वस्त विलास मराठे, किशोर बेंद्रे, सुरेंद्र भुरंगे, अशोक खंडेलवाल, डॉ. यशवंत मशानकर, जयंत पांढरीकर यांनी तसेच श्री एकविरा देवी संस्थानाचे अध्यक्ष डॉ. अनिल खरया, सचिव चंद्रशेखर कुळकर्णी, विश्वस्त राजेंद्र टेंबे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचा सपत्नीक सत्कार केला. श्री अंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे. याबाबत गडकरी यांनी माहिती जाणून घेतली.
मंदिराच्या विकास कामाबाबत सदस्य विलास मराठे यांनी माहिती दिली. मंदिराच्या विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.
दरम्यान नागपूर येथील कोराडी मंदिराच्या धर्तीवर अमरावतीतील अंबादेवी – एकवीरा देवी मंदिरांचा विकास व्हावा अशी अमरावतीकरांची इच्छा आहे. या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता गडकरी यांनी शक्य होईल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
बऱ्याच दिवसानंतर अंबादेवीचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. निवडणूक विजयानंतर मी ठरवलं होत, अंबादेवीचं दर्शन घ्यावं म्हणून मी इथं आलो असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी हे आज अमरावती शहरात विविध कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
हेही वाचा : 

पूर व्यवस्थापनासाठी सरकारचा प्लॅन; अमित शाहांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

अंडरवर्ल्डमध्ये दाऊद खिलाडी, तर इक्बालला अनाडी का म्हणतात?

NEET पेपर फुटी प्रकरण : महाराष्‍ट्र ‘एटीएस’ने घेतले दोन शिक्षकांना ताब्‍यात