मायावतींचा अखेर उत्तराधिकारी ठरला; दिली मोठी जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बसपा अध्यक्ष मायावती यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून आकाश आनंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. आकाश आनंद हे मायावती यांचे पुतणे आहेत. आकाश आनंद आता राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारी सांभाळतील, अशी माहिती बसपा नेते सरवर मलिक यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा जिंकता आली नाही. आता बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती …

मायावतींचा अखेर उत्तराधिकारी ठरला; दिली मोठी जबाबदारी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बसपा अध्यक्ष मायावती यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून आकाश आनंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. आकाश आनंद हे मायावती यांचे पुतणे आहेत. आकाश आनंद आता राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारी सांभाळतील, अशी माहिती बसपा नेते सरवर मलिक यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा जिंकता आली नाही. आता बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी रविवारी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांच्या नावाची त्यांचे राजकीय वारसदार आणि पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीचा आढावा घेण्यासाठी लखनौ येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची पुष्टी बसपा नेत्यांनी केली आहे. याआधी मे महिन्यात मायावतींनी त्यांना पदावरून हटवले होते आणि सांगितले होते की, “पक्षाची कोणतीही जबाबदारी देण्यापूर्वी त्यांच्याकडे प्रगल्भता यायला हवी.”
लखनौ येथील बैठकीला राज्यभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. आनंद देखील या बैठकीला उपस्थित होते.

BSP chief Mayawati has announced Akash Anand, (Mayawati’s nephew) as her successor. Akash Anand will take charge of the national coordinator: BSP leader Sarvar Malik pic.twitter.com/A0ALXuSVBH
— ANI (@ANI) June 23, 2024