18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवार (दि.२४ जून) पासून सुरू होणार आहे, (18th Lok Sabha Session) ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील, त्यानंतर हंगामी अध्यक्षांची निवड होईल आणि दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषण करतील, असे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने दिले आहे.
सोमवारी(दि.२४जून) सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ शपथ घेणार आहेत. बुधवारी २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार (18th Lok Sabha Session) आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे.
सोमवारी (दि.२४ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळासह 280 नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. तर 264 नवनिर्वाचित खासदार दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.२५ जून) शपथ घेतील (18th Lok Sabha Session).
एप्रिल-जूनमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर हे पहिलेच लोकसभेचे अधिवेशन (18th Lok Sabha Session) असेल. 18 व्या लोकसभेत, NDA कडे 293 जागांसह बहुमत आहे, यामध्ये भाजपकडे 240 जागा आहेत, जे बहुमताच्या 272 पेक्षा कमी आहे. तर विरोधी गट असलेल्या इंडिया आघाडीकडे 234 जागा आहेत, ज्यात काँग्रेसचा वाटा 99 आहे.
Lok Sabha session to begin from June 24 with oath-taking, Speaker election
The first session of the 18th #LokSabha beginning on June 24 will see oath-taking by newly elected members followed by election of the Lok Sabha Speaker on June 26 and President #DroupadiMurmu‘s address… pic.twitter.com/pTP3doSNw9
— DD News (@DDNewslive) June 23, 2024