बिहारमध्ये एका आठवड्यात तिसरा पूल कोसळला; २ कोटी रूपये पाण्यात
Bharat Live News Media ऑनलाईन ; बिहार (Bihar) मध्ये पूल कोसळण्याच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेईनात असे दिसून येत आहे. इथे एका आठवड्यात तब्बल तिसरा पूल कोसळला आहे. आता मोतिहारी मध्ये ही घटना घडली आहे. याआधी अररिया आणि सीवान येथे पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पुलाचे काम सुरू होते. या प्रकल्पाची किंमत तब्बल दोन कोटी रूपये होती.
या विषयी अधिक माहिती अशी की, पूल कोसळण्याची घटना पूर्व चंपारणच्या मोतिहारीतील घोडासहन ब्लॉक मध्ये चैनपूर स्टेशन जवळील मार्गावर झाली. या ठिकाणी २ कोटी रूपयांच्या बजेटमध्ये या पुलाचे काम सुरू होते.
काल सिवानमध्येही पूल कोसळला होता
बिहारच्या सिवानमध्ये कालही पूल कोसळल्याची घटना घडली होती. येथे महाराजगंज-दरोंदा विधानसभेच्या सीमेला जोडणारा पूल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कोणत्याही वादळ आणि पावसाशिवाय पूल कमकुवत होऊन कोसळल्याचे आश्चर्यकारक असल्याचे लोकांनी सांगितले. यावेळी ना वादळ आले ना पाऊस, तरीही महाराजगंज परिसरातील पाटेधी-गरौलीला जोडणाऱ्या कालव्यावर बांधलेला पूल कोसळला.
हेही वाचा :
Maharashtra Assembly Elections | महत्त्वाची बातमी! राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये?
आमदारच्या पुतण्याचा कारनामा…! विरुद्ध दिशेने गाडी चालवून एकाला जागीच चिरडले
Monsoon Updates : रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह घाटमाथ्यास आज ‘रेड अलर्ट’