सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबालचे आज लग्न, संध्येला रिसेप्शन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल आज लग्नबंधनात अडकणार आहेत. आधी दोघांचा साखरपुडा होईल. नंतर रजिस्टर्ड मॅरिज होईल. नंतर सायंकाळी मुंबईच्या दादरमध्ये शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरेंट बॅस्टियनमध्ये रिसेप्शन पार्टी होईल.
रिपोर्टनुसार, जहीरचा मेकअप आर्टिस्ट राजू नागने सांगितले की, पहिली लग्नपत्रिका सलमान खानला मिळाली आहे. त्यामुळे या लग्नसोहळ्यात सलमान खान सहभागी होईल. रिसेप्शन पार्टीत वेब सीरीज ‘हिरामंडी’ची संपूर्ण स्टार कास्ट सहभागी होईल.
काल सोनाक्षीच्या घरी पूजा
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाआधी शनिवारी सायंकाळी घरी ‘रामायणा’मध्ये एक पूजा ठेवली होती. सोनाक्षीची आई पूनम सिन्हांनी ही पूजा ठेवली होती. यावेळी हुमा कुरैशी, भाऊ साकिब सलीम सोनाक्षीच्या घरी दिसले.
मित्रांसोबत लंच करताना दिसला जहीर
शनिवारी रात्री सोनाक्षी पूजामध्ये मग्न होती तर जहीर मित्रांसोबत मुंबईतील एका रेस्टॉरेंटमध्ये डिनर पार्टी करताना दिसतात. यावेळी जहीरची बहिण सेलिब्रिटी स्टायलिस्ट सनम रत्नासी देखील उपस्थित राहिली.
सोनाक्षीचा पीच कलरचा लहेंगा…
शनिवारी सायंकाळी पीच कलरचा लहेंगादेखील सोनाक्षीच्या घरी आला. शुक्रवारी, या लव्हबर्डचे मेहंदी आणि हळदी सोहळा झाला. हे फोटो जहीरची बहिण आणि सेलिब्रिटी स्टायलिस्ट सनम रत्नासीचे मित्र जफर अली मुंशीने शेअर केले आहेत.