ISRO ची आणखी एक कमाल! ‘पुष्पक’चे तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने रविवारी (दि. २३) आणखी एक मैलाचा दगड पार केला. ISRO ने आज रियुजेबल लॉन्च व्हेईकल (RLV) च्या लँडिंग प्रयोग (LEX) मध्ये सलग तिसऱ्यांदा आणि अंतिम यश मिळविले. “पुष्पक”ने आव्हानात्मक परिस्थितीत आधुनिक स्वायत्त क्षमता दाखवून भूपृष्ठावर समांतर असे अचूक लँडिंग केले, अशी माहिती ISRO ने X …
ISRO ची आणखी एक कमाल! ‘पुष्पक’चे तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने रविवारी (दि. २३) आणखी एक मैलाचा दगड पार केला. ISRO ने आज रियुजेबल लॉन्च व्हेईकल (RLV) च्या लँडिंग प्रयोग (LEX) मध्ये सलग तिसऱ्यांदा आणि अंतिम यश मिळविले. “पुष्पक”ने आव्हानात्मक परिस्थितीत आधुनिक स्वायत्त क्षमता दाखवून भूपृष्ठावर समांतर असे अचूक लँडिंग केले, अशी माहिती ISRO ने X ‍‍‍वर पोस्ट करत दिली आहे.
LEX (03) च्या मालिकेतील तिसरी आणि अंतिम चाचणी कर्नाटक येथील चित्रदुर्ग येथे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR) येथे आयोजित करण्यात आली होती. आरएलव्ही लेक्स-०१ आणि लेक्स-०२ मोहिमांच्या यशानंतर आरएलव्ही लेक्स-०३ ने पुन्हा अधिक आव्हानात्मक रिलीज परिस्थितीत RLV ची स्वायत्त लँडिंग क्षमता सिद्ध केली.

Hat-trick for ISRO in RLV LEX! 🚀
🇮🇳ISRO achieved its third and final consecutive success in the Reusable Launch Vehicle (RLV) Landing EXperiment (LEX) on June 23, 2024.
“Pushpak” executed a precise horizontal landing, showcasing advanced autonomous capabilities under… pic.twitter.com/cGMrw6mmyH
— ISRO (@isro) June 23, 2024

RLV-LEX3 images pic.twitter.com/PO0v0StC3A
— ISRO (@isro) June 23, 2024

Go to Source