तेलंगणात शेतकर्‍यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ

हैदराबाद : निवडणूक जाहीरनाम्यात घोषित केल्याप्रमाणे तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील शेतकर्‍यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असून 15 ऑगस्टपासून लागू होणार्‍या या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर 31 हजार कोटींचा भार पडणार आहे. तेलंगणाच्या मंत्रिमंडळाने या कर्जमाफीवर शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब केले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी …

तेलंगणात शेतकर्‍यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ

हैदराबाद : निवडणूक जाहीरनाम्यात घोषित केल्याप्रमाणे तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील शेतकर्‍यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असून 15 ऑगस्टपासून लागू होणार्‍या या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर 31 हजार कोटींचा भार पडणार आहे.
तेलंगणाच्या मंत्रिमंडळाने या कर्जमाफीवर शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब केले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले की, 21 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या काळात शेतकर्‍यांनी घेतलेली कर्जे माफ केली जाणार आहेत. या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांबाबत सरकार लवकरच आदेश जारी करणार आहे. ते म्हणाले की, या कर्जमाफीमुळे सरकारी तिजोरीतून तेलंगणाला 31 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. या कर्जमाफीचा तेलंगणातील 40 लाख शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री रेड्डी पुढे म्हणाले की, काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करीत जनतेच्या खास करून शेतकर्‍यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या आधीच्या बीआरएसच्या सरकारच्या कालावधीत दहा वर्षांत फक्त 28 हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले होते.

Go to Source