भारतात २०२८ मध्ये COP33 परिषद – PM मोदींचा प्रस्ताव
पुढारी ऑनलाईन डेस्क: युएईमधील दुबईत कालपासून (दि.३० नोव्हें) २८ व्या हवामान बदल शिखर परिषदेला सुरूवात झाली आहे. या परिषदेत पीएम मोदी देखील उपस्थित आहेत. दरम्यान आज (दि.१) परिषदेला संबोधित करताना, पीएम मोदी यांनी COP28 सदस्यांपुढे एक नवीन प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
दुबईत सुरू असलेल्या COP28 परिषदेत पीएम मोदी यांनी ३३ व्या (COP33) हवामान बदल शिखर परिषदेचे भारतात आयोजन करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान २०२८ मध्ये होणारी ही ३३ वी हवामान बदल परिषद ही भारतात व्हावी असा प्रस्ताव पीएम मोदी यांनी दुबईतील COP28 उच्च-स्तरीय समितीसमोर ठेवला आहे, असेही एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
At the COP28 high-level segment in Dubai, PM Narendra Modi proposes to host COP33 in India in 2028. pic.twitter.com/G8TWCCvrlA
— ANI (@ANI) December 1, 2023
#WATCH दुबई, संयुक्त अरब अमीरात | HoS/HoG के लिए COP28 उच्च-स्तरीय खंड के उद्घाटन पर PM मोदी ने कहा, “भारत जलवायु परिवर्तन प्रक्रिया के लिए संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्क के प्रति प्रतिबद्ध है। इसीलिए इस मंच से, मैं 2028 में भारत में COP33 शिखर सम्मेलन की मेजबानी करने का प्रस्ताव रखता… pic.twitter.com/pSr8McGBUf
— ANI_HindiNews (@AHindinews) December 1, 2023
पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले, भारत हवामान बदल प्रक्रियेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्कसाठी वचनबद्ध आहे. म्हणूनच या व्यासपीठावरून मी 2028 मध्ये भारतात COP33 शिखर परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवतो आहे.
भारत 3% अक्षय उर्जेसाठी वचनबद्ध- पीएम मोदी
दुबईतील COP28 च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पीएम मोदी म्हणाले, भारताने, आपल्या G20 अध्यक्षपदावरून ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या भावनेने हवामानाच्या मुद्द्याला सातत्याने महत्त्व दिले आहे. आम्ही एकत्रितपणे हरित विकास करारावर सहमती दर्शवली आहे. आम्ही शाश्वत विकासासाठी जीवनशैली तत्त्वे तयार केली असून, जागतिक स्तरावर 3% अक्षय उर्जेसाठी वचनबद्ध आहोत, असेही पीएम मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.
हेही वाचा:
COP28 हा परिपूर्ण उपाय नाही, कष्ट घ्यावे लागणार- सद्गुरु जग्गी वासुदेव
Cop28 dubai: हरित, समृद्ध भविष्य घडवण्यासाठी भारत-यूएई एकत्र-पीएम मोदी
Cop28 dubai : हवामान बदलासंदर्भात आजपासून दुबईत COP-28 परिषद
The post भारतात २०२८ मध्ये COP33 परिषद – PM मोदींचा प्रस्ताव appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क: युएईमधील दुबईत कालपासून (दि.३० नोव्हें) २८ व्या हवामान बदल शिखर परिषदेला सुरूवात झाली आहे. या परिषदेत पीएम मोदी देखील उपस्थित आहेत. दरम्यान आज (दि.१) परिषदेला संबोधित करताना, पीएम मोदी यांनी COP28 सदस्यांपुढे एक नवीन प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. दुबईत सुरू असलेल्या COP28 परिषदेत पीएम मोदी यांनी ३३ …
The post भारतात २०२८ मध्ये COP33 परिषद – PM मोदींचा प्रस्ताव appeared first on पुढारी.