राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या एक आठवड्यांहून पावसाने उघडीप घेतली होती. मात्र बुधवार १९ मे पासून राज्यातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Weather Forecast) पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ.के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. डॉ. के.एस. होसाळीकर यांनी केलेल्या ‘X’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुढील २४ ते …

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: गेल्या एक आठवड्यांहून पावसाने उघडीप घेतली होती. मात्र बुधवार १९ मे पासून राज्यातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Weather Forecast) पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ.के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.
डॉ. के.एस. होसाळीकर यांनी केलेल्या ‘X’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुढील २४ ते ४८ तासांत राज्याच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये कोकणत विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये उद्या २३ जून रोजी रेड अलर्ट असून, अतिवृष्टीची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

22 Jun, IMD मॉडेल मार्गदर्शनानुसार पुढील 24 आणि 48 तासांत राज्याच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
कृपया IMD अद्यतनांसाठी पहा. Konkan region mod to heavy continue. pic.twitter.com/12BSWXz3VV
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 22, 2024

दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढणार
आजपासून पुढील ४,५ दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्ह्यात IMD द्वारे अतिवृष्टीचे अलर्ट जारी केले आहेत. मराठवाड्याच्या काही भागात आज (दि.२२ जून) वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही पुणे हवामान प्रादेशिक विभागाचे विभागप्रमुख डॉ.के. एस. होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

22 Jun, पुढील ४,५ दिवसांत आजपासून दक्षिण #कोकणासह राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. येथे दर्शविल्याप्रमाणे IMD द्वारे अतिवृष्टीचे अलर्ट जारी केले आहेत. #मराठवाड्याच्या काही भागात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृपया पहात रहा व दक्ष रहावे. pic.twitter.com/Yf43lY23hp
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 22, 2024

राज्यातील ‘या’ भागांना ऑरेंज अलर्ट
२२ जून: सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उर्वरित महराष्ट्रात यलो अलर्ट
२३ जून: सिंधुदुर्ग (रेड अलर्ट), रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा
२४ जून: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर आणि सातारा
२६ जून: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सातारा आणि पुणे