वेस्ट इंडिजचा अमेरिकेवर ९ गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपर 8 फेरीतील सामन्यात वेस्ट इंडिजने अमेरिकेविरुद्ध नऊ गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. आता वेस्ट इंडिजचा तिसरा सामना 24 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. गेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा इंग्लंडविरुद्ध दारुण पराभव झाला होता. तर अमेरिकेला उपांत्य फेरी गाठणे कठीण आहे. या विजयासह वेस्ट इंडिजने …

वेस्ट इंडिजचा अमेरिकेवर ९ गडी राखून विजय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सुपर 8 फेरीतील सामन्यात वेस्ट इंडिजने अमेरिकेविरुद्ध नऊ गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. आता वेस्ट इंडिजचा तिसरा सामना 24 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. गेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा इंग्लंडविरुद्ध दारुण पराभव झाला होता. तर अमेरिकेला उपांत्य फेरी गाठणे कठीण आहे.
या विजयासह वेस्ट इंडिजने गट दोनमध्ये मोठा बदल केला आहे. या विजयामुळे वेस्ट इंडिजच्या खात्यात 2 गुणांची भर पडली आहे. यामुळे वेस्ट इंडिज दोन गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर, इंग्लंड दोन सामन्यांत एका विजयासह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. सुपर-8 मध्ये आतापर्यंत एकही विजय मिळवलेला अमेरिकन संघ चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका सध्या या गटात चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अमेरिकेने 19.5 षटकांत 10 विकेट गमावत 128 धावा केल्या. प्रत्युत्तरात शाई होपच्या नाबाद 82 धावांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने 10.5 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आणि सामना नऊ गडी राखून जिंकला. वेस्ट इंडिजला आपला पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवल्यास ते उपांत्य फेरीतील आपले कन्फर्म करतील. 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली.
शाई होप आणि जॉन्सन चार्ल्स यांच्यात पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली. सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हरमीत सिंगने चार्ल्सला मिलिंद कुमारकरवी झेलबाद केले. त्याला केवळ 15 धावा करता आल्या. यानंतर निकोलस पुरनने पदभार स्वीकारला. सलामीवीर म्हणून त्याने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांमध्ये 63 धावांची नाबाद भागीदारी झाली. पुरणने 12 चेंडूत 1 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. तर, होपने तुफानी कामगिरी केली. त्याने चार चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 82 धावा केल्या.
अमेरिकेचे वेस्ट इंडिजला आव्हान
सामन्यात प्रथम फलंदाजी करत अमेरिकेने वेस्ट इंडिजला विजयासाठी 129 धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा डाव 19.5 षटकांत 128 धावांवर आटोपला. अमेरिकेकडून अँड्रिस गॉसने सर्वाधिक 29 धावा केल्या. त्याच वेळी, वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
फलंदाजीमध्ये अमेरिकेच्या डावाची सुरूवात खराब झाली. स्टीव्हन टेलर दोन धावा करून बाद झाला. यानंतर गौसने नितीश कुमारसोबत 48 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी गुडाकेश मोतीने मोडली. त्याने नितीशला एलबीडब्ल्यू केले. नितीशला 19 चेंडूत 20 धावा करता आल्या. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात गौसही अल्झारी जोसेफचा बळी ठरला. तो 16 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 29 धावा करून बाद झाला. कर्णधार आरोन जोन्स (11), कोरी अँडरसन (7) आणि हरमीत सिंग (0) यांना रोस्टन चेसने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चेसने 14व्या षटकात सलग दोन चेंडूंवर अँडरसन आणि हरमीतला बाद केले होते. मिलिंद कुमार 19 धावा करून बाद झाला तर शॅडली वॉन 18 धावा करून बाद झाला. केंजिगेने एक धाव घेतली तर, सौरभ नेत्रावलकर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. अली खान सहा चेंडूत १४ धावा केल्यानंतर नाबाद राहिला.