जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात योगदिन साजरा; अनेकांचा सहभाग
जळगाव – Bharat Live News Media वृत्तसेवा – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन हजारापेक्षा अधिक खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन ” म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने 21 जून रोजी जळगाव जिल्ह्यात आज सकाळी हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव, नेहरू युवा केंद्र संघटन, जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ, जळगाव जिल्हा क्रीडा संघटना महासंघ, जळगाव जिल्हा योग संघटना, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, जळगाव, यांचे संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे शुक्रवार (दि.२१) रोजी सकाळी ७.०० वाजता जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत, प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. अधिकारी वेवोतोलु केजो, शिक्षणाधिकारी माध्यमिक जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, समन्वयक नेहरू युवा केंद्र संघटन जळगाव गट शिक्षणाधिकारी, सरला पाटील गट शिक्षणाधिकारी खलील शेख, , विनोद बियाणी, रेड क्रॉस, जयश्री पाटील, श्री समाधान बर्कले, पतंजली योग समिती, जळगांव, डॉ अनिता पाटील, जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन, प्रा डॉ नारायण खडके, शिव छत्रपती पुरस्कारर्थी, किशोर चौधरी, शिव छ्त्रपती क्रीडा पुरस्कारार्थी सुमेध तळवेलकर, आदी मान्यवर उपस्थीत होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या, रविंद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सर्व मान्यवरांचे योगाचे पुस्तक देऊन स्वागत केले. त्या नंतर कॉमन योगा प्रोटोकॉल नुसार सर्व उपस्थितांनी योगासने आणि प्राणायाम केले. या कॉमन योगा प्रोटोकॉल चे प्रात्यक्षिक जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन च्या खेळाडूंनी सादर केले. अनुभुती इंग्लिश मेडियम स्कुल द्वारा म्युझिकल योगा विद्यार्थ्यांमार्फत प्रात्यक्षिक क्रीडा शिक्षक स्मिता बुरकुल, श्वेता कोळी यांनी मार्गदर्शन केले.
सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सुजाता गुल्हाणे, क्रीडा अधिकारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मिनल थोरात, किशोर चौधरी, भारत देशमुख, विनोद कुलकर्णी , उमेश मराठे, गोविंद सोनवणे, विनोद माने, संजय महिरे, सुरज पवार, अविनाश महाजन आदीनी परिश्रम घेतले.
हेही वाचा:
International Yoga Day : माधवी निमकरने केले सर्वात कठीण योगासन
तरुणांच्या नैराश्यात वाढ; टेलिमानस सेवेद्वारे 80 हजारांपेक्षा अधिक जणांवर उपचार