सिमला भीषण अपघात; ४ ठार, ३ गंभीर जखमी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हिमाचल राज्य परिवहन महामंडळाची रोहरू डेपोची बस कुड्डूहून गिलताडीकडे जात असताना झालेल्या अपघातात चालक आणि कंडक्टरसह चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील जुब्बल तहसील अंतर्गत कुड्डू येथून गिलताडी गावाकडे हिमाचल राज्य परिवहन महामंडळाची रोहरू डेपोची बस जात होती. बसमध्ये चालक आणि कंडक्टर यांच्यासह सातजण होते. सुमारे चार किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर बस टेकडीवरून खाली घसरली. हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चालक आणि ऑपरेटरसह चार जणांचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस प्रशासनाने अपघातस्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. एसडीएम जुब्बल राजीव संख्ये यांनी अपघाताला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा
तामिळनाडू विषारी दारू प्रकरण; मृतांचा आकडा ४७ वर
धावपट्टी विस्तारावर थेट संरक्षणमंत्र्यांना पत्रच; केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ घेणार भेट