अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात ४ लाखांची चोरी

मुंबई : सिनेअभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सुमारे चार लाखांची रोकड आणि एक निगेटिव्ह रिळ चोरी करुन पलायन केले. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरुन दोन तरुणांनी आत प्रवेश करुन ही चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याच फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी …

अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात ४ लाखांची चोरी

मुंबई : सिनेअभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सुमारे चार लाखांची रोकड आणि एक निगेटिव्ह रिळ चोरी करुन पलायन केले. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरुन दोन तरुणांनी आत प्रवेश करुन ही चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याच फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनुपम खेर यांचे अंधेरीतील विरा देसाई रोडवर एक खासगी कार्यालय आहे. बुधवारी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी काम संपल्यानंतर लॉक लावून निघून गेले होते. रात्री उशिरा दोन तरुण त्यांच्या कार्यालयात घुसले होते. त्यांनी ड्रॉवरमधील चार लाखांची कॅश आणि एक निगेटिव्ह रिळ घेऊन पलायन केले होते. हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.
हेही वाचा 

नाशिक : महाकाय ट्रेलरमुळे अंबड लिंकरोडचा ट्रेलरमुळे कोंडला श्वास
कुटुंब कलह : नात्यांमध्ये जेव्हा नियम तोडले जातात तेव्हा काय होते?
Hoardings Scam | नाशिकमधील होर्डिंग्ज घोटाळा विधिमंडळात