एकनाथ खडसेंनी घेतली अमित शहांची भेट, भाजपमध्ये प्रवेश करणार?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या. ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे आणि शहा यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
एकनाथ खडसेंना भाजपमध्ये मोठी जबाबदारी देणार असल्याची चर्चाही सुरु आहे. दरम्यान, नाथाभाऊ मोठे नेते आहेत, त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतीलच आणि योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नुकताच माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता.
भाजप माझे घर आहे. भाजपच्या पायाभरणीपासून घर होईपर्यंत मी काही ना काही योगदान दिलेले आहे. काही नाराजीमुळे बाहेर पडलो होतो. आता ती नाराजी दूर झालेली आहे, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी यापूर्वी केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मला संकट काळात आधार दिला. त्याबद्दल त्यांचा मी ऋणी असल्याची भावनाही खडसेंनी व्यक्त केली होती. आता खडसे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
हे ही वाचा :