धुळ्यात किसान काँग्रेसतर्फे किसान संवाद यात्रा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत प्रदेश किसान काँग्रेसच्यावतीने धुळे जिल्हयात दि.4 आणि 5 डिसेंबर रोजी शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हयातील संवाद यात्रेचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी नंदुरबार येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर  सिंदबंद ता.साक्री येथून या संवाद यात्रेला प्रारंभ … The post धुळ्यात किसान काँग्रेसतर्फे किसान संवाद यात्रा appeared first on पुढारी.
#image_title

धुळ्यात किसान काँग्रेसतर्फे किसान संवाद यात्रा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत प्रदेश किसान काँग्रेसच्यावतीने धुळे जिल्हयात दि.4 आणि 5 डिसेंबर रोजी शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हयातील संवाद यात्रेचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी नंदुरबार येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर  सिंदबंद ता.साक्री येथून या संवाद यात्रेला प्रारंभ होणार आहे.  जिल्हयातील शेतकरी व नागरीकांनी या संवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन धुळे जिल्हा किसान काँग्रेस व जिल्हा काँग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे.
शेतकरी संवाद यात्रेच्या नियोजनासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आ.कुणाल पाटील यांच्या देवपूर येथील संपर्क कार्यालयात काँग्रेस व किसान काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे.पिक विम्याची रक्कम अजूनही मिळाली नाही.तरीही शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला सरकार तयार नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रदेश किसान काँग्रेसतर्फे शेतकरी संवाद यात्रा होणार आहे. दि.11 डिसेंबर रोजी  संवाद यात्रेचे रुपांतर मोर्चात होवून नागपूर येथे विधानभवनावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.  धुळे जिल्हयात सोमवार दि.4 व 5 डिसेंबर रोजी होणार्‍या शेतकरी संवाद यात्रेच्या पूर्वतयारीसाठी आज  धुळ्यात माजी मंत्री  रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकरी संवाद यात्रेचा मार्ग व सभेचे ठिकाण निश्‍चित करण्यात आले.
अशी असेल यात्रा….
दि.4डिसेंबर रोजी नंदुरबार येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या हस्ते संवाद यात्रेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर नंदुरबार येथून निघालेल्या संवाद यात्रेचे सोमवार दि.4 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वा.सिंदबंद ता.साक्री येथे संवाद यात्रेचे आगमन होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वा.छडवेल कोर्डे येथे स्वागत व कार्नर सभा,टीटाणे फाटा, जैताणे येथे स्वागत तर निजामपूर येथे संध्या.7 वा. सभा होणार आहे.बळसाणे ता.साक्री येथे रात्री 9 वा.मुक्काम होणार आहे. सोमवार दि.5डिसेंबर रोजी बळसाणे येथून शेतकरी संवाद यात्रा मार्गस्थ होवून कढरे,लोणखेडी,लामकानी येथे पोहचणार आहे. दु.3 वा.चिंचवार ता.धुळे येथे शेतकरी संवाद यात्रेचे स्वागत व विश्रांती होणार आहे.त्यानंतर दु.4 वा.धुळे तालुक्यातील मेहेरगाव,निमडाळे,गोंदूर येथे स्वागत करण्यात येणार आहे. संध्या.7 वा. वलवाडी-भोकर येथे शेतकरी संवाद यात्रेच्या समारोप सभेचे आयोजन केले जाणार आहे. जिल्हयातील शेतकरी,शेतमजुर,नागरीकांनी शेतकरी संवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस व किसान काँग्रेसच्यावतीने करण्यात आले. संवाद यात्रेच्या नियोजन बैठकिला माजी मंत्री रोहिदास पाटील,माजी.खा.बापू चौरे,माजी आ.डि.एस.अहिरे, किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तम बापू देसले,काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे,काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे,साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे,किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाम भामरे, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, माजी सभापती गुलाबराव कोतेकर,माजी पं.स.सभापती भगवान गर्दे,माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील,विशेष कार्यअधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा समन्वयक डॉ.दत्ता परदेशी,कार्याध्यक्ष डॉ.विलास बिरारी,जि.प.सदस्य विश्‍वास बागुल, पी.एस.पाटील,सचिन सोनवणे साक्री शहर काँग्रेस अध्यक्ष,पंकज सुर्यवंशी,कपिल जाधव, किशोर पाटील,सागर देसले, रावसाहेब पाटील,राजीव पाटील, बापू खैरनार आदी उपस्थित होते
हेही वाचा :

Pimpri Crime News : ज्येष्ठाचे 27 लाख हिसकवणार्‍या चौघांना अटक
Pimpri News: बदनामी करण्यासाठी बोगस तक्रारींचा आधार
Ajit Pawar | लोकसभेसाठी ४ जागा लढवणार, अजित पवारांची घोषणा, ठाकरेंच्या जागांवरही डोळा!

The post धुळ्यात किसान काँग्रेसतर्फे किसान संवाद यात्रा appeared first on पुढारी.

धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत प्रदेश किसान काँग्रेसच्यावतीने धुळे जिल्हयात दि.4 आणि 5 डिसेंबर रोजी शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हयातील संवाद यात्रेचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी नंदुरबार येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर  सिंदबंद ता.साक्री येथून या संवाद यात्रेला प्रारंभ …

The post धुळ्यात किसान काँग्रेसतर्फे किसान संवाद यात्रा appeared first on पुढारी.

Go to Source