तामिळनाडू विषारी दारू प्रकरण; मृतांचा आकडा ४७ वर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू येथील कल्लाकुरीची या ठिकाणी विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा ४७ वर गेला आहे. अशी माहिती तामिळनाडूचे वैद्यकीय शिक्षण संचालक जे. संगुमणी यांनी दिली आहे.
तामिळनाडू येथील कल्लाकुरीची या ठिकाणी गुरुवारी (दि.२०) विषारी दारू पिऊन ३४ जणांचा मृत्यू झाला. आता याप्रकरणातील मृतांचा आकडा आज (दि.२१) ४७ वर गेला आहे. तामिळनाडूचे वैद्यकीय शिक्षण संचालक जे. संगुमणी यांनी दिली आहे. कल्लाकुरी येथील काही लोकांनी बेकायदा मद्य विक्रेत्याकडून मद्याच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. मद्य पिल्यानंतर आतापर्यंत ४७ लोक मृत पावले आहेत तर ९० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेकायदा मद्य विक्रेत्यास पोलिसांनी गुरुवारी (२०) अटक केली आहे. घटास्थळावरून २०० लिटरचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणावरून स्टॅलिन सरकारला धारेवर धरले आहे. निष्पाप लोकांच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ही घटना समजताच गुरुवारी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि उपचार घेत असलेल्या लोकांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. माजी न्यायमूर्ती बी गोकुळदास यांचा समावेश असलेल्या एक सदस्यीय आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी ३ महिन्यांत अहवाल सादर करण्याची घोषणा केली आहे.
Kallakurichi hooch tragedy | Death toll rises to 47, says Tamil Nadu Director of Medical Education, J. Sangumani
— ANI (@ANI) June 21, 2024
हेही वाचा
बिहारमधील विषारी दारुकांड प्रकरण पोहोचले सर्वोच्च न्यायालयात
Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संसदीय समितीकडून चौकशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
बिहार: विषारी दारू पिल्याने ६० हून अधिक जणांचा मृत्यू; अनेक गावांवर शोककळा, १२६ जण पोलिसांच्या ताब्यात