राजकीय भवितव्याच्या चिंतेने ग्रासले; विपरीत निर्णय घेण्याची मानसिकता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राजकीय भवितव्य ब्लॉक होऊ नये म्हणून वर्षभरापूर्वी शरद पवारांची साथ सोडून अजितदादांच्या संगतीला आलेल्या छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ यांच्या मनातील अलीकडील चलबिचल लपून राहिलेली नाही. लोकसभा निकालाने स्वपक्षाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने मोठ्या पवारांचे दोन्ही शिष्योत्तम उद्या उज्ज्वल आशेपोटी विपरीत निर्णयाप्रत आल्यास ते आश्चर्य वाटू नये. या दोहोंच्या बदलत चाललेल्या …

राजकीय भवितव्याच्या चिंतेने ग्रासले; विपरीत निर्णय घेण्याची मानसिकता

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – राजकीय भवितव्य ब्लॉक होऊ नये म्हणून वर्षभरापूर्वी शरद पवारांची साथ सोडून अजितदादांच्या संगतीला आलेल्या छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ यांच्या मनातील अलीकडील चलबिचल लपून राहिलेली नाही. लोकसभा निकालाने स्वपक्षाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने मोठ्या पवारांचे दोन्ही शिष्योत्तम उद्या उज्ज्वल आशेपोटी विपरीत निर्णयाप्रत आल्यास ते आश्चर्य वाटू नये. या दोहोंच्या बदलत चाललेल्या भूमिका तूर्तास सावध स्वरूपात असल्या तरी भविष्यातील घरवापसीचे त्या निदर्शक असल्याचा अर्थ काढण्यास पूरक ठराव्यात.
लोकसभा निवडणूकपूर्व आणि पश्चात राज्यात अनेक घडामोडी प्रत्ययास आल्या. नाशिकचा महायुती उमेदवार ठरण्यासाठी झालेला कालापव्यय ही त्याच साखळीतील एक ठळक घडामोड मानल जाते. राज्याचे बाहुबली मंत्री छगन भुजबळ हेच नाशिकमधील उमेदवार असतील, काळ्या दगडावरील धवल रेघ प्रदेश भाजपाच्या नेतृत्वाच्या नापसंतीमुळे उमटायची राहून गेली. तिथून सुरू झालेले भुजबळ यांच नाराजीनाट्य राज्यसभेवर न पाठवण्याच्या स्वकीयांच्या निर्णयामुळे गहरे झाले. मराठा ओबीसी आरक्षणाबाबत त्यांच्या रोखठोक भूमिका, तदनुषंगिक मंत्रिपदाच राजीनामा, महाविकास आघाडीबाबतच् सॉफ्ट कॉर्नर आदी बाबी भुजबळ यांच अस्वस्थता अधोरेखित करणाऱ्या ठराव्यात. भरीस भर भुजबळ यांनी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांत महायुतीसाठी झोकून देऊन काम न केल्याचा आरोप होत आहे. पक्षात मिळत असलेले दुय्यम स्थान लक्षात घेता भुजबळांसह त्यांच्या अधिपत्याखालील समता परिषद कार्यकत्यांत खदखद असून, ते लवकरच वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात
येत आहे.
दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्षपदाचे बिरुद मिरवणाऱ्या नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेतही बदल झाल्याची प्रचिती अलीकडील घटनांवरून येत आहे. लोकसभेत डॉ. भारती पवार यांची सर्वाधिक पीछेहाट दिंडोरी विधानसभा क्षेत्रात झाली. दिंडोरी मतदारसंघातील लढत शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केल्यानेच झिरवाळ यांनी महायुती उमेदवाराच्या प्रचारात फारसा रस दाखवला नसल्याचे सांगण्यात येते. शिवाय, बुधवारच्या त्यांच्या वाढदिवशीच्या फलकबाजी आणि जाहिरातीत शरद पवारांची छायाचित्रे असणे, शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवाराला मतदान करण्याचे जाहीर आवाहन करणे वगैरे बाबी झिरवाळ यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीचे प्रत्यंतर देणाऱ्या ठराव्यात. अर्थात, भुजबळ काय किंवा झिरवाळ, दोन्ही नेत्यांनी तसा इन्कार करीत पक्षाप्रति निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना बरेच काही सांगून जाताहेत. कार्यकत्यांच्या रेट्याच्या नावाखाली उद्या दोन्ही नेत्यांनी घरवापसीचा निर्णय घेतल्यास ती नवलाई ठरू नये.
चिंतेपोटी दोन्ही थडींवर हात ?
भुजबळ आणि झिरवाळ दोन्ही बड्या पदांसह सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. शीर्षस्थ नेत्याच्या समीप असलो तरी तीन पक्षांचा गाडा चालवताना नेत्याच्या निर्णय क्षमतेला मर्यादा असल्याचे या दोहोंच्या लक्षात आले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती आणि स्वपक्षाची पीछेहाट झालीय. या पार्श्वभूमीवर इतर नेत्यांप्रमाणे या जोडगोळीला राजकीय भवितव्याची चिंता सतावत असणार, आपापल्या मतदारसंघांतील मतदार दादांपेक्षा साहेबांवर अधिक निष्ठा ठेवून असल्याचेही ज्येष्ठ म्हणवणाऱ्या या दोघांच्या लक्षात आले आहे. विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे प्रमेयं राहिल्यास पराभवाचा बट्टा लावून घेण्यापेक्षा घरवापसी करून राजकीय करिअर सुरक्षित करण्यात काय गैर आहे, असाही विचार त्यांच्या मनात असू शकतो.
हेही वाचा:

नाशिक : महाकाय ट्रेलरमुळे अंबड लिंकरोडचा ट्रेलरमुळे कोंडला श्वास
Nifty चा नवा विक्रमी उच्चांक! IT स्टॉक्स तेजीत, कारण काय?