बार्शी : घारी शिवारातील फटाके कारखान्यात स्फोट
बार्शी ; Bharat Live News Media वृत्तसेवा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घारी शिवारात एका फटाके कारखान्यात स्फोट झाला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने आज वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे व कारखान्यात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. घटनास्थळी पांगरी पोलीस दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
दीड वर्षांपूर्वीच पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरी शिवारात एका फटाके कारखान्यात स्फोट होऊन त्यामध्ये पाच महिला ठार झाल्याची घटना घडली होती. असे असतानाच पुन्हा घरी येथे फटाके कारखान्यात स्फोट झाल्यामुळे सोलापूर जिल्हात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
ओबीसींना धक्का कसा लागणार नाही हे सरकारनं सांगावं : लक्ष्मण हाके
केजरीवालांच्या जामीन आदेशाविरोधात ‘ईडी’ची उच्च न्यायालयात धाव
महायुती जागावाटपाचा तिढा कसा सोडवणार? नऊ जागांवर अजित पवार गटाचा दावा