बीबीए, बीसीए अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त सीईटी होणार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि बीसीए या अभ्यासक्रमांसाठी यावर्षी प्रथमच सीईटी प्रवेश परीक्षा घेतली. परंतु बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांना याची पुरेशी माहिती नसल्याने राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना ही सीईटी देता आली नाही. दरम्यान महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षने परिपत्रक जाहीर करत सीईटी होणार पुन्हा होणार असल्याचे म्हटले आहे.
सीईटी पुन्हा होणार…
महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, “जाहीर सुचना, बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एम.एस व बी.बी.एम या अभ्यासक्रमांच्या अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षेबाबत….
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एम.एस व बी.बी.एम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता या कार्यालयामार्फत दिनांक २९/०५/२०२४ रोजी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. सदर सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये असंख्य उमेदवार सहभागी होऊ न शकल्यामुळे उमेदवार/पालक /संस्था यांनी या कार्यालयास व्यक्तीशाः भेट देऊन, विनंती अर्ज सादर करून, ई-मेल द्वारे त्याच प्रमाणे दूरध्वनीद्वारे अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत विनंती केलेली होती.
उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शासनाने या कार्यालयास बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एम.एस व बी.बी.एम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याची मान्यता दिलेली आहे. संबंधित परीक्षेबाबत या कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सुचना पाहण्यासाठी या कार्यालयाच्या संकेस्थळाला नियमितपणे भेट द्यावी. याची सर्व संबंधित विद्यार्थी/पालक/संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी.”
राज्यातील असलेल्या जागा
अभ्यासक्रम- महाविद्यालय- जागा
बीबीए- ३०५- ३२२१९
बीएमएम- २५- १९६४
बीसीए- ४९२- ५०१४१
बीएमएस- २४८- २४४०९
एकूण – १०७१- १०८७४१
हेही वाचा
UGC-NET 2024 | ‘यूजीसी-नेट लीक प्रश्नपत्रिका डार्कनेट, टेलिग्रामवर सापडली’
‘नेट’ परीक्षा रद्दचा 10 हजार विद्यार्थ्यांना फटका
आता एमबीए, एमसीए एकात्मिक अभ्यासक्रमांसाठीही सीईटी