‘नवीन योग अर्थव्यवस्था वाढत असल्याचं जग पाहतंय’- पीएम मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2024) साजरा केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. २१) देशातील जनतेला योगाला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आवाहन केले. पीएम मोदी यांनी आज श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे योगासने केली. आंतरराष्ट्रीय योग दिनी मला योग आणि साधनेची …
‘नवीन योग अर्थव्यवस्था वाढत असल्याचं जग पाहतंय’- पीएम मोदी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जगभरात १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2024) साजरा केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. २१) देशातील जनतेला योगाला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आवाहन केले. पीएम मोदी यांनी आज श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे योगासने केली.
आंतरराष्ट्रीय योग दिनी मला योग आणि साधनेची भूमी असलेल्या काश्मीरला येण्याचे सौभाग्य मिळाले. योगातून जी आम्हाला जी शक्ती मिळत आहे; त्याचा अनुभव आम्ही श्रीनगरमध्ये घेत आहोत. काश्मीरच्या भूमीतून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी देशातील सर्व जनतेला आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योग करत असलेल्या लोकांना शुभेच्छा देतो, असे पीएम मोदी म्हणाले.
“आज जगभरात योग करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. योगबद्दलचे आकर्षण वाढत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा १० वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण झाला आहे. २०१४ मध्ये, मी यूएनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. भारताच्या या प्रस्तावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला होता आणि हा एक विक्रम होता. तेव्हापासून योग दिन सातत्याने नवनवीन विक्रम नोंदवत आहे. गेल्या १० वर्षांत, योगाच्या विस्तारामुळे योगाशी संबंधित धारणा बदलली आहे. आज जग एक नवीन योग अर्थव्यवस्था वाढत असल्याचे पाहत आहे. ऋषिकेश आणि काशीपासून ते केरळपर्यंत, भारतात योग पर्यटनाचा एक नवीन ट्रेंड उदयास येत आहे. जगभरातून लोक योग शिकण्यासाठी भारतात येत आहेत. यामुळे आदरातिथ्य, पर्यटन आदी क्षेत्रांची भरभराट होत आहेत. यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत,” असे पीएम मोदी यांनी सांगितले.
मोदींकडून फ्रान्समधील १०१ वर्षीय महिला योग शिक्षिकेचा उल्लेख
यंदा फ्रान्समधील १०१ वर्षीय महिला योग शिक्षिकेला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या कधीच भारतात आल्या नाहीत. पण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य योगाच्या प्रचारासाठी समर्पित केले आहे, असेही पीएम मोदी यांनी नमूद केले.
“स्वतः आणि समाजासाठी योग” ही यावर्षीची योग दिनाची थीम आहे.

#WATCH | Prime Minister Narendra Modi greets participants of the Yoga session at Sher-i-Kashmir International Conference Centre (SKICC) in Srinagar in J&K; also clicks a selfie with them.
He led the Yoga session here this morning. pic.twitter.com/QKDge0fzih
— ANI (@ANI) June 21, 2024

 हे ही वाचा :

योग म्हणजे ईश्वराशी एकरूपता
पर्यटनात नव्या संधींची चाहूल