तळेगावात पाच ठिकाणी हवेत गोळीबार; पोलीस तपास सुरू

तळेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे शहरात गोळीबार तळेगाव दाभाडे शहरातील गाव भागात गुरुवारी (दि.२०) रात्री ८ते ८.१५ वा.सुमारास दोन दुचाकीवर आलेल्या ६ आज्ञातांनी शाळा चौक येथे २ ठिकाणी, राजेंद्र चौक येथे १ ठिकाणी,गजानन महाराज मंदिर जवळ १ठिकाणी,तुकाराम महाराज नगर परिसरात १ ठिकाणी असा एकुण ५ ठिकाणी हवेत गोळीबार केला. अशी प्रथम दर्शनी माहीती मिळाली आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत. गुन्हे शाखेची पथके शहरात दाखल झाली आहेत. गोळीबारामुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा
पोलिस भरतीवर पावसाचे ‘पाणी’
योग अभ्यास : आरोग्य ते करिअरचा मार्ग
नवी दिल्ली : फेक कॉल, मेसेजपासून लवकरच सुटका
