दहशतवाद्यांना धडा शिकवू : पंतप्रधान मोदी यांचा इशारा

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मिरात नुकतेच झालेले दहशतवादी हल्ले सरकारने गांभीर्याने घेतले असून, काश्मीरच्या शत्रूंना धडा शिकवला जाईल, त्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही. असा खणखणीत इशारा पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी श्रीनगरात दिला. दोन दिवसांच्या काश्मीर दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधानांनी गुरुवारी सायंकाळी श्रीनगरात तरुणांचे सशक्तीकरण व काश्मिरातील परिवर्तन या कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काश्मिरातील …

दहशतवाद्यांना धडा शिकवू : पंतप्रधान मोदी यांचा इशारा

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मिरात नुकतेच झालेले दहशतवादी हल्ले सरकारने गांभीर्याने घेतले असून, काश्मीरच्या शत्रूंना धडा शिकवला जाईल, त्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही. असा खणखणीत इशारा पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी श्रीनगरात दिला.
दोन दिवसांच्या काश्मीर दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधानांनी गुरुवारी सायंकाळी श्रीनगरात तरुणांचे सशक्तीकरण व काश्मिरातील परिवर्तन या कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काश्मिरातील परिस्थितीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आढावा घेतला आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून त्यांनी स्थिती जाणून घेतली. आपले सरकार जम्मू-काश्मीरच्या शत्रूंना धडा शिकवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. जम्मू-काश्मिरातील नवी पिढी शांतता व स्थैर्य असलेले जीवन जगेल, असा मला विश्वास आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले हक्काचे लोकप्रतिनिधी निवडता येणार आहेत, यापेक्षा चांगले आणखी काय असू शकते. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. तुम्ही तुमचे लोकप्रतिनिधी निवडाल हा दिवस आता दूर नाही. जम्मू आणि काश्मिरचे भविष्य उज्ज्वल करण्याची ही संधी आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 1500 कोटी रुपयांच्या 84 विकासकामांचे भूमिपूजन केले. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 हजार जणांना राज्य सरकारमधील नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत आज योग दिनाचा मुख्य कार्यक्रम
दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील दल सरोवराजवळ आयोजित योग शिबिरात विविध क्षेत्रांतील सात हजार अतिथींच्या उपस्थितीत योगसाधना करतील. दल सरोवराच्या काठावर हा अद्भुत सोहळा होणार आहे. या योग सोहळ्यामध्ये सात हजारांवर मान्यवर सहभागी होणार आहेत. मोदी यांच्या काश्मीर दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा :

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; पावसामुळे सप्टेंबरनंतरच होणार प्रक्रिया
लवकर जागा वाटपाची भाजपाची रणनीती
Yoga Day 2024 : योग म्हणजे ईश्वराशी एकरूपता