मध्य भारतातील हज यात्रेकरू सुखरूप : हाजी मोहम्मद कलाम

नागपूर; पुढारी वृत्तेसवा : पवित्र मक्का मदीना येथील कमाल तापमान ५२ अंश सेल्सिअस गेले आहे. यामुळे हजयात्रेच्या दरम्यान उष्माघातामुळे अनेक हजयात्रेकरूंचा मृत्यू झाला. मृतात भारतातील अनेक यात्रेकरूंचा समावेश असला तरी नागपूर व मध्य भारतातील कुणाचाही समावेश नाही. सगळे सुखरूप आहेत, अशी माहिती हज यात्रेकरूंच्या निवास, प्रवास व इतर सुविधांची देखभाल करणाऱ्या सेंट्रल तंझीम कमेटीचे सचिव …

मध्य भारतातील हज यात्रेकरू सुखरूप : हाजी मोहम्मद कलाम

नागपूर; Bharat Live News Media वृत्तेसवा : पवित्र मक्का मदीना येथील कमाल तापमान ५२ अंश सेल्सिअस गेले आहे. यामुळे हजयात्रेच्या दरम्यान उष्माघातामुळे अनेक हजयात्रेकरूंचा मृत्यू झाला. मृतात भारतातील अनेक यात्रेकरूंचा समावेश असला तरी नागपूर व मध्य भारतातील कुणाचाही समावेश नाही. सगळे सुखरूप आहेत, अशी माहिती हज यात्रेकरूंच्या निवास, प्रवास व इतर सुविधांची देखभाल करणाऱ्या सेंट्रल तंझीम कमेटीचे सचिव हाजी मोहम्मद कलाम यांनी ‘Bharat Live News Media’शी बोलताना दिली.
स्थानिक हज कमिटीकडेही या संदर्भात अद्याप कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजच आमचे राज्य कमिटी व सेंट्रल कमिटीशी बोलणे झाले. मात्र यात्रेकरूंच्या या यादीत नागपूर तसेच मध्य भारतातील कोणीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील १३१७ यात्रेकरू नागपुरातील विमानतळावरून हज यात्रेला रवाना झाले होते. सात जुलै नंतर त्यांच्या परतीचा कार्यक्रम निश्चित होणार आहे.
हेही वाचा :

Hajj Yatra 2024 : ५७७ हज यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू; 2 हजार जण रुग्णालयात
Hajj pilgrims Death | ९० भारतीय हज यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू, सुत्रांची माहिती
Hajj Yatra 2024 : कोल्हापूरचे 450 यात्रेकरू सुरक्षित; सांगलीच्या महिलेचा मृत्यू?