सांगली : राजारामबापू कारखान्यासमोर स्वाभिमानीचं आंदोलन
इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा सांगली जिल्ह्यातील ऊस दरावर तोडगा निघत नसल्याने ऊस दर आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व राजारामबापू साखर कारखाना प्रशासनामध्ये झालेल्या बैठकीत दरावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संघटनेने आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. खा. राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते कारखान्याच्या गेटवर ठिय्या मांडून बसले आहेत.
दरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांच्यात झटापट झाली. सकाळपासून कारखान्यावर सुरू असलेले आंदोलन अजूनही सुरूच आहे. ३१०० रुपयांपेक्षा जास्त पहिली उचल देण्यास कारखान्याने नकार दिल्याने हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजारामबापू साखर कारखान्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ऊस दराचा तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजाराम बापू कारखाण्याच्या गव्हाणीत उड्या मारल्या यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
हेही वाचा :
कोल्हापूर : भोगावतीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रा.शिवाजीराव पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजाराम कवडे यांची निवड
मराठी पाट्यांसाठी मनसेकडून पुण्यात खळखट्याक!
युद्धविराम संपला : इस्रायलची हमास विरोधात मोहीम तीव्र; ६ पॅलेस्टिनी नागरिक ठार | Israel Resumes Gaza Bombing
The post सांगली : राजारामबापू कारखान्यासमोर स्वाभिमानीचं आंदोलन appeared first on पुढारी.
इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा सांगली जिल्ह्यातील ऊस दरावर तोडगा निघत नसल्याने ऊस दर आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व राजारामबापू साखर कारखाना प्रशासनामध्ये झालेल्या बैठकीत दरावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संघटनेने आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. खा. राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते कारखान्याच्या गेटवर ठिय्या मांडून बसले आहेत. दरम्यान …
The post सांगली : राजारामबापू कारखान्यासमोर स्वाभिमानीचं आंदोलन appeared first on पुढारी.