
धाराशिव, Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असलेली प्रवेश परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेमध्ये झालेल्या गोंधळाबद्दल हि परिक्षा पुन्हा घेण्यात यावी. यासाठी धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि.20) परिक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन विद्यार्थांनी त्यांनी मागण्या सादर केल्या. निवेदनात म्हटले आहे, अपार मेहनत करुन, भविष्याची स्वप्नं बघत परीक्षा देत असतो. आमच्या भविष्याशी, संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांशी क्रूर खेळ होत आहे. एरवी 600 गुणांना सरकारी वैद्यकीय कॉलेजेमधे प्रवेश मिळतो. तर ह्यावर्षी 690 गुण घेतलेले त्रासून गेलो आहेत. त्यांना प्रवेशाची खात्री नाही. त्यामुळे नीट परीक्षा रद्द करून ती पुन्हा नव्याने घेण्यात यावी. यावेळी विद्यार्थ्यासोबतच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी एस. एस. देशमुख, प्राचार्य एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य एस. के. घार्गे, पर्यवेक्षक एम. व्ही. शिंदे तसेच छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एन. पाटील व भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
हेही वाचा :
NEET Exam 2024 : नीट व नेट परीक्षा गोंधळावरून विद्यार्थी भडकले, शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
Ashadhi Wari 2024 | संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान
परभणी -ताडकळस ते महातपुरी शिवरस्ता खुला करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर दगडफेक
