पडसाद उमटले, धुळ्यात शोभा बच्छाव यांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’

धुळे : पुढारी वृत्तसेवा- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या करणाऱ्या कसायाची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी पाठराखण केल्याचा आरोप करीत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार बच्छाव यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांकडून पाय धुतल्याच्या घटनेचा निषेध करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला देखील जोडे मारण्यात आले. धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा …
पडसाद उमटले, धुळ्यात शोभा बच्छाव यांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या करणाऱ्या कसायाची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी पाठराखण केल्याचा आरोप करीत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार बच्छाव यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांकडून पाय धुतल्याच्या घटनेचा निषेध करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला देखील जोडे मारण्यात आले.
धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव आणि मालेगाव येथील एका व्यक्तीचे संभाषण असणारी क्लिप व्हायरल झाली. याचे पडसाद आज धुळे शहरात उमटले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या महानगर शाखेच्या वतीने आज खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. झाशी राणी चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. बच्छाव यांच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या .
आंदोलनाला यांची उपस्थिती
या प्रसंगी महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते रवी बेलपाठक, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामण गवळी, महिला मोर्चा उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, जिल्हा सरचिटणीस, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, सोशल मिडीया प्रमुख पवन जाजु, जिल्हा प्रवक्ते शाम पाटील, मंडल प्रमुख अमोल मासुळे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, चिटणीस निशा चौबे, भटके विमुक्त अध्यक्ष आण्णा खेमणार, उपाध्यक्ष छोटु थोरात, माजी नगरसेवक सुनिल बैसाणे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जिवन शेंडगें, रमेश करंकाळ, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा –

नांदेड : ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन
UGC NET 2024 |यूजीसी-नेट परीक्षा पुन्हा घेणार, पेपरफुटी प्रकरणाचा तपास CBI कडे