कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर दाभोळेत गॅस टँकर उलटल्याने मार्ग बंद

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा- मिर्‍या-नागपूर महामार्गावर दाभोळे घाटात गॅस टँकर उलटल्याने कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुढील दोन ते तीन तास हा मार्ग बंद राहण्याची शक्यता असून, कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यानची वाहतूक साखरपा-देवरुख मार्गे वळवण्यात आली आहे. दरम्यान, टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये भरण्याचे काम यंत्रणेने सुरु केले आहे. अधिक वाचा – लातूर : मुलांना CBSE …

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर दाभोळेत गॅस टँकर उलटल्याने मार्ग बंद

रत्नागिरी : Bharat Live News Media वृत्तसेवा- मिर्‍या-नागपूर महामार्गावर दाभोळे घाटात गॅस टँकर उलटल्याने कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुढील दोन ते तीन तास हा मार्ग बंद राहण्याची शक्यता असून, कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यानची वाहतूक साखरपा-देवरुख मार्गे वळवण्यात आली आहे. दरम्यान, टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये भरण्याचे काम यंत्रणेने सुरु केले आहे.
अधिक वाचा –

लातूर : मुलांना CBSE शिक्षण देता येत नसल्याने आईने मुलीसह संपवले जीवन

 
कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यान दाभोळे घाटात अवघड वळणावर निसरडया रस्त्यावर गॅस टँकर दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान उलटला व रस्ता बंद झाला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अवजड वाहने पाली दरम्यान थांबवण्यात आली तर साखरपाकडून येणारी वाहने साखरपा देवरुख मार्गे रत्नागिरीकडे वळवण्यात आली. कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहने पालीपासून थांबवण्यात आल्याने लांबचलांब रांगा लागल्या होत्या.