बीड -२४ तासानंतर तलावात सापडला बुडालेल्या युवकाचा मृतदेह

परळी वैजनाथ: Bharat Live News Media वृत्तसेवा – तालुक्यातील भोपळा येथील तलावात पोहताना बुडालेल्या युवकाचा मृतदेह २४ तासानंतर आज २० जून रोजी सकाळी आठच्या सुमारास तलावात सापडला. गणेश माणिकराव फड (वय २२) असे युवकाचे नाव आहे. मृतदेह आढळून आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. दुपारी कन्हेरवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अधिक वाचा –
आता लगबग पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमांची!
परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील गणेश माणिकराव फड हा पुणे येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुट्टीमुळे तो कन्हेरवाडी येथे आपल्या गावी आला होता. दोन-चार दिवसांनी पुण्याला परत जाणार होता. दरम्यान, बुधवारी, १९ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गणेश मित्रासोबत भोपळा येथील तलावात पोहोण्यासाठी गेला होता. पोहत असताना अचानक तो बुडाला.
अधिक वाचा –
Amol Mitkari |”दादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली”; मिटकरींची कदमांवर टीका
नगर पालिकेच्या नैसर्गिक आपत्ती निवारण व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काल दिवसभर गणेशचा तलावात शोध घेतला. परंतु त्याचा शोध लागला नव्हता. आज सकाळी ७ वाजता पुन्हा तलावात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली.
अधिक वाचा –
नागपूर : सीपीडब्ल्यूडी कॉलनीत वृद्ध जोडप्याचा गूढ मृत्यू
अखेर आठ वाजण्याच्या सुमारास गणेशचा मृतदेह आढळून आला. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर कन्हेरवाडी येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेशच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ आहे.
