कोल्हापूर : भोगावतीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रा.शिवाजीराव पाटील यांची निवड
राशिवडे ; पुढारी वृतसेवा भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार पी.एन.पाटील गटाचे प्रा.शिवाजीराव आनंदराव तथा एस.ए.पाटील- देवाळेकर यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजाराम शंकर कवडे (आवळी बु) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या अध्यक्षस्थानी निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.निलकंठ करे होते. यावेळी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
भोगावतीची निवडणूक तिरंगी झाली. यामध्ये सतारूढचे नेते आमदार पी.एन.पाटील, शेकापचे संपतराव पवार-पाटील, राष्ट्रवादीचे ए.वाय.पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांच्या आघाडीने २५ पैकी २४ जागांवर विजय मिळवित सता पुन्हा मिळविली. तर संस्थापक कै.दादासाहेब पाटील आघाडीचे धैर्यशिल पाटील हे एकमेव विजयी झाले, तर भाजप, स्वाभिमानी, शिवसेना आघाडी पराभूत झाली. अपेक्षेप्रमाणे अध्यक्षपद पी.एन.गटाकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी, शेकापकडे जाण्याची शक्यता होती.
गुरूवारी दिवसभर नेत्यांची आणी रात्री सर्व संचालकांची बैठक शाहुपुरीतील बोद्रे बँकेमध्ये संपन्न झाली, आणी निवडीचे अधिकार आमदार पी.एन.पाटील, राष्ट्रवादीचे ए.वाय.पाटील, शेकापचे क्रांतीसिह पवार-पाटील यांना देण्यात आले. त्यानुसार बंद लखोट्यातून नावे देण्यात आली. त्यानुसार दु.१ वा. निवड प्रक्रियेस सुरूवात झाली. अध्यक्षपदासाठी प्रा.पाटील यांचे तर उपाध्यक्षपदासाठी कवडे यांचे नाव सुचविण्यात आले. यावेळी स्वागत प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केले. आभार सेक्रेटरी उदय मोरे यांनी मानले.
अखेर दै. पुढारीचे लिखाण, अचुक राजकीय अंदाज ठरला तंतोतंत
निवडणुकीपासून निकालापर्यत आणी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीपर्यत दै.पुढारीने अचुक, परफेक्ट केलेला राजकीय अंदाज खरा ठरला. अगदी निवडणुकीसाठी होणाऱ्या संभाव्य आघाड्या, युती आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबतचे लिखाण तंतोतंत खरे ठरले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दै.पुढारीचे अभिनंदन केले.
The post कोल्हापूर : भोगावतीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रा.शिवाजीराव पाटील यांची निवड appeared first on पुढारी.
राशिवडे ; पुढारी वृतसेवा भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार पी.एन.पाटील गटाचे प्रा.शिवाजीराव आनंदराव तथा एस.ए.पाटील- देवाळेकर यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजाराम शंकर कवडे (आवळी बु) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या अध्यक्षस्थानी निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.निलकंठ करे होते. यावेळी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भोगावतीची निवडणूक तिरंगी झाली. यामध्ये सतारूढचे नेते …
The post कोल्हापूर : भोगावतीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रा.शिवाजीराव पाटील यांची निवड appeared first on पुढारी.