युद्धविराम संपला : इस्रायलची हमास विरोधात मोहीम तीव्र; ६ पॅलेस्टिनी नागरिक ठार
पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझामधील युद्धविरामचा कालावधी संपल्यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा हमास विरोधात हल्ले सुरू केले आहेत. कालावधी संपल्यानंतर युद्धविराम वाढवण्याबद्दल कोणताही करार होऊ न शकल्याने इस्रायलने पुन्हा एकदा हमासला लक्ष्य केले आहे. यात गाझातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (Israel Resumes Gaza Bombing)
हमासने युद्धविरामच्या अटींचे उल्लंघन केले, तसेच इस्रायलच्या दिशेने हल्ले केले असा आरोप इस्रायलच्या संरक्षण दलाने केले आहे. हमासने इस्रायलच्या दिशेने डागलेले क्षेपणास्त्र निकामी करण्यात यश आल्याचे संरक्षण दलाने म्हटले आहे. यानंतर इस्रायलने लढाऊ विमान, ड्रोन यांच्या मदतीने गाझावर हल्ले सुरू केले आहेत.
Hamas violated the operational pause, and in addition, fired toward Israeli territory.
The IDF has resumed combat against the Hamas terrorist organization in Gaza. pic.twitter.com/gVRpctD79R
— Israel Defense Forces (@IDF) December 1, 2023
७ ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले, यात १४०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्रायलने हमास विरोधात युद्ध पुकारले यात १५००० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपानंतर सात दिवसांपूर्वी हमास आणि इस्रायल यांच्यात युद्धविराम पुकारण्यात आला. यात बंधक बनवण्यात आलेल्या काही नागरिकांना इस्रायल आणि हमासने मुक्त केले.
हेही वाचा
Sanjay Raut | संजय राऊतांच्या ‘हिटलर’ पोस्टवर मोठा वाद, इस्रायली दूतावासाची MEA कडे तक्रार
israel hamas war: इस्रायल-हमासमध्ये चार दिवसांची युद्धबंदी : १३ इस्रायली महिला, लहान मुलांची सुटका होणार
विदेशनीती : इस्रायल – हमास वादात भारताची भूमिका
The post युद्धविराम संपला : इस्रायलची हमास विरोधात मोहीम तीव्र; ६ पॅलेस्टिनी नागरिक ठार appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझामधील युद्धविरामचा कालावधी संपल्यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा हमास विरोधात हल्ले सुरू केले आहेत. कालावधी संपल्यानंतर युद्धविराम वाढवण्याबद्दल कोणताही करार होऊ न शकल्याने इस्रायलने पुन्हा एकदा हमासला लक्ष्य केले आहे. यात गाझातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (Israel Resumes Gaza Bombing) हमासने युद्धविरामच्या अटींचे उल्लंघन केले, तसेच इस्रायलच्या दिशेने हल्ले केले असा …
The post युद्धविराम संपला : इस्रायलची हमास विरोधात मोहीम तीव्र; ६ पॅलेस्टिनी नागरिक ठार appeared first on पुढारी.