तामिळनाडूत विषारी दारू पिल्याने २९ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू येथील कल्लाकुरीची या ठिकाणी विषारी दारू पिऊन २९ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिसप्रमुखांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बेकायदा मद्य विक्रेत्याकडून गावातील काही लोकांनी मद्याच्या बाटल्या खरेदी केल्या. विषारी दारू सेवनामुळे …

तामिळनाडूत विषारी दारू पिल्याने २९ जणांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू येथील कल्लाकुरीची या ठिकाणी विषारी दारू पिऊन २९ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिसप्रमुखांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
बेकायदा मद्य विक्रेत्याकडून गावातील काही लोकांनी मद्याच्या बाटल्या खरेदी केल्या. विषारी दारू सेवनामुळे मृतांची संख्या २९ वर पोहोचली आहे, तर १०० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी सांगितले. बेकायदा मद्य विक्रेत्यास पोलिसांनी अटक केली आहे. घटास्थळावरून २०० लिटरचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणावरून स्टॅलिन सरकारला धारेवर धरले आहे. निष्पाप लोकांच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

Death toll due to alleged illicit liquor consumption in Kallakurichi rises to 29, confirms Kallkurichi District Collector MS Prashanth.#TamilNadu https://t.co/OhawkUyva2 pic.twitter.com/hNazFR671B
— ANI (@ANI) June 20, 2024

हेही वाचा : 

नेट परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या शक्यतेने केंद्राचा निर्णय, लवकरच फेरपरीक्षा
धक्कादायक! ५७७ हज यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू; 2 हजार जण रुग्णालयात
दिल्ली एनसीआरमध्ये उष्णतेचा कहर; राजधानीत 33 जणांचा मृत्यू