हेडफोनच्या अतिवापरामुळे येऊ शकतो बहिरेपणा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना अचानक ऐकायला येणे बंद झाल्याची धक्कादायक बातमी त्यांनी सोशल मीडियावरून दिली. पाठोपाठ हेडफोनचा कमी वापर करा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला आहे. हेडफोनच्या अतिवापरामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. आजकाल मोबाईलवर गाणी ऐकणे, फोनवर बोलणे, वेबसीरिज पाहणे अशा सवयींमुळे सातत्याने हेडफोन वापरला …

हेडफोनच्या अतिवापरामुळे येऊ शकतो बहिरेपणा

पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना अचानक ऐकायला येणे बंद झाल्याची धक्कादायक बातमी त्यांनी सोशल मीडियावरून दिली. पाठोपाठ हेडफोनचा कमी वापर करा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला आहे. हेडफोनच्या अतिवापरामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
आजकाल मोबाईलवर गाणी ऐकणे, फोनवर बोलणे, वेबसीरिज पाहणे अशा सवयींमुळे सातत्याने हेडफोन वापरला जातो. हेडफोनच्या अतिवापरामुळे कानांच्या पडद्यावर परिणाम होतो. कमी ऐकू येणे, कानांवर अतिरिक्त ताण निर्माण होणे, मेंदूपर्यंत जाणार्‍या नसांना इजा पोहोचणे आणि त्यामुळे बहिरेपणा येणे, असा धोका पोहोचण्याची शक्यता असते.
इअरफोन किंवा हेडफोनने मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कानांची ऐकण्याची क्षमता फक्त 90 डेसिबल आहे, जी सतत ऐकून 40-50 डेसिबलपर्यंत कमी होऊ शकते. हेडफोन लावून तासन्तास गाणे ऐकल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. हेडफोनमधून निघणार्‍या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या उद्भवते. बर्‍याच लोकांना झोपेचा त्रास, निद्रानाश किंवा अगदी स्लीप अ‍ॅपनियाचा त्रास होऊ शकतो. हेडफोनचा दीर्घकाळ वापर केल्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
अशी घ्या काळजी
गरज नसल्यास हेडफोनचा वापर टाळावा.
हेडफोनच्या अतिवापरामुळे कानात वेगवेगळे आवाज येणे, चक्कर येणे, कान दुखणे, डोकेदुखी, झोप न येणे अशा तक्रारी सुरू होतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कान दुखत असल्यास तेल घालणे किंवा स्वत:च्या मनाने ड्रॉप आणून घालणे टाळावे.