आमगावात शेअर मार्केटचे अमिष दाखवून 3 कोटींची फसवणूक

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून प्रति महिना सात टक्के दराने पैसे परत देतो, असे लोकांना आमिष दाखवून 3 कोटी रूपयांची फसवणुक करणार्‍या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. किसन चंपालाल पांडे ( वय 21), कन्हैया चंपालाल पांडे (वय 24 ) दोघही (रा. बनिया मोहल्ला, आमगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे …

आमगावात शेअर मार्केटचे अमिष दाखवून 3 कोटींची फसवणूक

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून प्रति महिना सात टक्के दराने पैसे परत देतो, असे लोकांना आमिष दाखवून 3 कोटी रूपयांची फसवणुक करणार्‍या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. किसन चंपालाल पांडे ( वय 21), कन्हैया चंपालाल पांडे (वय 24 ) दोघही (रा. बनिया मोहल्ला, आमगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी चल्वुराज व्यंकटरंगप्पा कमैय्या (वय 58 रा. आमगाव) तसेच इतर साक्षीदारांना आरोपी किसन पांडे आणि कन्हैया पांडे या दोघांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करुन त्यांना प्रति महिना अतिरिक्त दराने परतावा करतो असे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन करुन त्यांना पैसे देण्यास भाग पाडले. यादरम्यान फिर्यादी आणि साक्षीदार यांच्याकडून 3 कोटी 19 लाख 75 हजार रुपये घेवून अप्रामाणिकपणे अपहार करुन फिर्यादीची फसवणुक केली आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींच्या राहते घराची घरझडती घेतली. त्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तीच्या आणि वेगवेगळ्या व्यवसायाच्या नावाने संशयित आरोपींनी 38 बँक खाती वेगवेगळ्या बँकेत उघडल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच आरोपीं राहते घरातुन 6 टी. व्ही, एक लॅपटॉप, 65 हजार रुपये रोख रक्कम तसेच एक नोट मोजण्याची मोठी मशिन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :

चंद्रपूरात वेगवेगळ्या घटनांमध्ये लाच घेताना चौघांना अटक
फुकट्या प्रवाशांनो सावधान; मध्य रेल्वे करणार कडक कारवाई
रायगड: वरंधा घाटात रस्ता खचला; वाहतूक धोकादायक