संसद परिसरातील महापुरूषांचे पुतळे पूर्ववत स्थापित करा : मल्लिकार्जून खर्गे

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : संसद परिसरातील महापुरुषांचे हटविण्यात आलेले पुतळे पुन्हा त्याच जागांवर स्थापित करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना पत्र लिहिले आहे.
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांचे पुतळे आधीच्या जागेवरून उचलून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले होते. पुतळे स्थानांतरित केल्याने लोकशाहीच्या मूळ भावनेचे उल्लघंन झाले असून हा महापुरुषांचा अवमान असल्याचे खर्गे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा :
लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी : पंकजा मुंडे
तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज; मुख्यमंत्र्याची उपस्थिती
आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला
