मोठा निर्णय! 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला आहे. मंगळवारी (दि.19) दिल्लीत झालेल्या केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये तांदूळ २३०० रूपये प्रति क्विंटल जो खर्चाच्या किंमतीपेक्षा ५० टक्के अधिक आहे. ज्वारी ३३७१ रूपये , बाजरी २६२५ रूपये , रागी ४२९० रूपये, मक्का …

मोठा निर्णय! 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला आहे. मंगळवारी (दि.19) दिल्लीत झालेल्या केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये तांदूळ २३०० रूपये प्रति क्विंटल जो खर्चाच्या किंमतीपेक्षा ५० टक्के अधिक आहे. ज्वारी ३३७१ रूपये , बाजरी २६२५ रूपये , रागी ४२९० रूपये, मक्का २२२५ रूपये, प्रति क्विंटल करण्यात आला.
तृणधान्यामध्ये तुर ७५५० रुपये, मुंग ८६८२ रूपये, उडद ७४०० रुपये प्रति क्विंटल. या व्यतिरिक्त तेलबियांमध्ये शेंगदाणा ६७८३ रूपये, सूर्यफूल ७२८० रूपये, सोयाबीन ४८९२ रूपये, शीशम ९२६७ रूपये, नायजर सीड ८७१७ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली. नगदी पिकांमध्ये कापूस मध्यम धागा ७१२१ रुपये तर लांब धागा कापूस ७५२१ प्रति क्विंटल करण्यात आला आहे. याशिवाय, वायू उर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ७४५३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोदी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली.
हेही वाचा :

Nashik Bribe News | २०१६ चे लाच प्रकरण भोवले , लिपिकास चार वर्ष सक्तमजूरी
Jalgaon | दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपींच्या अटकेसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
महाराष्ट्रात जुलैमध्ये भाजपची धन्यवाद यात्रा: चंद्रशेखर बावनकुळे