तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज!

नाते, पुढारी वृत्तसेवा : दुर्गराज रायगड सेवा समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांच्यावतीने रायगडावर दरवर्षी तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा केला जातो. जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच (दि.20) जून दिवशी रायगडवर छत्रपती शिवाजी महारांजाचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा केला जाणार आहे. 6 जूनप्रमाणे या शिवराज्याभिषेकाची देखील प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमदार भरत …

तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज!

नाते, Bharat Live News Media वृत्तसेवा : दुर्गराज रायगड सेवा समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांच्यावतीने रायगडावर दरवर्षी तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा केला जातो. जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच (दि.20) जून दिवशी रायगडवर छत्रपती शिवाजी महारांजाचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा केला जाणार आहे. 6 जूनप्रमाणे या शिवराज्याभिषेकाची देखील प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
यावर्षी या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमदार भरत गोगावले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रम रायगडवर 20 रोजी सकाळी ध्वज पूजन करण्यात येणार आहे. यानंतर सात वाजता शिवरायांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. आठ वाजता नगारखान्यासमोर ध्वजारोहण केले जाणार आहे. नऊ वाजता मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार असून त्यानंतर शाही शोभायात्रा काढली जाणार आहे. या सर्व सोहळ्यानंतर महाप्रसाद आणि गड स्वच्छता मोहीम असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
मावळ्यांसाठी खास सुविधा
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. दरम्यान महाड बाजूने रायगडाकडे येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांकरता कोंझर,वाडा, वाळसुरे, अक्षय कन्स्ट्रक्शन येथे मोकळ्या जागी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच माणगावकडून येणाऱ्या वाहनांकरिता कवळीचा माळ, सोमजाई मंदिर व शिवसृष्टीची जागा या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. गडावर येणाऱ्या शिवप्रेमींची कोणती गैरसोय होऊ नये याकरता पिण्याच्या पाण्याची सुविधा ,आरोग्य व्यवस्था तसेच कडक पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. पार्किंग ठिकाणाहून रायगड पायथा आणि रोपे-वे पर्यंत एसटी बस सुविधा करण्यात आलेली आहे.
हेही वाचा :

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड
Raigad Shiv Rajyabhishek | ‘गड किल्ल्यांसाठी 2 हजार कोटी शासनाने द्यावे, अन्यथा किल्ले रायगडवरून खाली उतरणार नाही’; छत्रपती संभाजी राजे !
Rajmata Jijau : शिवरायांची किर्ती सांगते आईचं माझी गुरु