पुढारी ऑनलाईन डेस्क : कालपासून(दि.३० नोव्हें) युएईमधील दुबई शहरात २८ वी हवामान बदल शिखर परिषद सुरू झाली आहे. या परिषदेला ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव हे देखील सहभागी झाले आहे. दरम्यान, दुबईमधून बोलताना, हवामान बदलावर COP हा परिपूर्ण उपाय नसल्याचे परखड मत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी व्यक्त केले आहे. (COP28 Summit)
सद्गुरू यांनी दुबईमधून माध्यमांशी बोलताना पुढे म्हटले की, COP हा कार्यक्रम जागतिक स्तरावरील कार्यक्रम आहे, त्यामुळे यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. हा एक जागतिक स्तरावरील प्रयत्न असून, हा परिपूर्ण उपाय नाही, असे मत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी व्यक्त केले आहे. (COP28 Summit)
COP28 Summit : सद्गुरुंकडून कार्यशैलीचा पुर्नउच्चार
ज्या प्रकारे भारत इतर राष्ट्रांना उर्जा देत आहे. ज्याप्रकारे भारत आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. ते एका रात्रीत घडणारे नाही. एखाद्या गोष्टीबद्दल प्रथम आपण विचार करतो, मग आपण त्यावर बोलतो, मग त्यात आपल्या भावना गुंतवतो. आणि त्यानंतर आपण एखाद्या गोष्टीसाठी सहमत आहोत किंवा असहमत आहोत यावर मत मांडतो. त्यानंतर आपण सुधारणा करण्यासाठी कार्य करतो, अशी कार्यशैली देखील सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी युएईमधून माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.
#WATCH | Dubai, UAE: On COP28 Summit, Isha Foundation Founder Sadhguru Jaggi Vasudev says, “… The way we energize the nations, the way we improve our economies is not gonna happen overnight. This is how human beings function. First, we think of something, then we talk, then we… pic.twitter.com/QOLMRE6NMc
— ANI (@ANI) December 1, 2023
हेही वाचा:
Cop28 dubai: हरित, समृद्ध भविष्य घडवण्यासाठी भारत-यूएई एकत्र-पीएम मोदी
Cop28 dubai : हवामान बदलासंदर्भात आजपासून दुबईत COP-28 परिषद
Cop28 dubai : पीएम मोदी COP 28 शिखर परिषदेत सहभागी होणार
The post COP28 हा परिपूर्ण उपाय नाही, कष्ट घ्यावे लागणार’ appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : कालपासून(दि.३० नोव्हें) युएईमधील दुबई शहरात २८ वी हवामान बदल शिखर परिषद सुरू झाली आहे. या परिषदेला ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव हे देखील सहभागी झाले आहे. दरम्यान, दुबईमधून बोलताना, हवामान बदलावर COP हा परिपूर्ण उपाय नसल्याचे परखड मत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी व्यक्त केले आहे. (COP28 Summit) सद्गुरू यांनी दुबईमधून …
The post COP28 हा परिपूर्ण उपाय नाही, कष्ट घ्यावे लागणार’ appeared first on पुढारी.