टेलीग्राम, व्हॉटस्ॲपवर टास्क देऊन तरुणाची फसवणूक

जळगाव पुढारी वृत्तसेवा – चाळीसगाव शहरातील देशमुख वाडा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरूणाला टेलीग्राम व व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देवून त्यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने वेळोवेळी पैसे घेवून कोणताही परतावा न देता तब्बल १२ लाख ७९ हजार ३७५ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना दि. १८ रोजी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रात्री साडेआठ वाजता जळगाव सायबर पोलीस …

टेलीग्राम, व्हॉटस्ॲपवर टास्क देऊन तरुणाची फसवणूक

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा – चाळीसगाव शहरातील देशमुख वाडा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरूणाला टेलीग्राम व व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देवून त्यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने वेळोवेळी पैसे घेवून कोणताही परतावा न देता तब्बल १२ लाख ७९ हजार ३७५ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना दि. १८ रोजी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रात्री साडेआठ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील देशमुख वाडा येथे विशाल रामराव सुर्यवंशी वय २७ हा तरूण वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. १० मे २०२४ रोजी विशालला प्लेक्स मुव्हीज या टेलीग्रामवर तसेच व्हॉटस्ॲपवर आणि कस्टमर केंअर व्हॉटस्ॲप क्रमांकावरून फोन व मॅसेज करून त्याला टास्क पुर्ण करण्याचे बहाणा करून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विशालकडून वेळोवेळी बॅक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने एकुण १४ लाख ३२ हजार ४०७ रूपये घेतले. त्यातील १ लाख ५३ हजार रूपये परतावा केला. परंतू उर्वरित रक्कम १२ लाख ७९ हजार ३७५ परत दिली नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे विशालच्या लक्षात आले. त्यानंतर दि. १८ रोजी रात्री साडेआठ वाजता जळगाव येथील सायबर पोलीसात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.