बारामतीला पावसाने झोडपले ! तासाभरात पडला 99 मिमी पाऊस

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर व तालुक्यात बुधवारी (दि. 9) रात्री अवकाळी पाऊस झाला. विशेषतः बारामती शहरात पावसाचा जोर अधिक होता. अवघ्या तासाभरातच शहरात सुमारे 99 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहराच्या विविध भागांत पाणीच पाणी झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. चार दिवसांपूर्वी शहरात अवकाळीच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. परंतु, … The post बारामतीला पावसाने झोडपले ! तासाभरात पडला 99 मिमी पाऊस appeared first on पुढारी.
#image_title

बारामतीला पावसाने झोडपले ! तासाभरात पडला 99 मिमी पाऊस

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर व तालुक्यात बुधवारी (दि. 9) रात्री अवकाळी पाऊस झाला. विशेषतः बारामती शहरात पावसाचा जोर अधिक होता. अवघ्या तासाभरातच शहरात सुमारे 99 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहराच्या विविध भागांत पाणीच पाणी झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. चार दिवसांपूर्वी शहरात अवकाळीच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. परंतु, बुधवारी रात्री मात्र पावसाने झोडपून काढले. सव्वाआठला सुरू झालेला पाऊस साडेनऊपर्यंत कोसळत होता. पावसामुळे शहरातील सर्व रस्ते जलमय झाले. तालुक्याच्या काही भागांतही बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली. पावसाचा ऊसतोडणीवरही परिणाम होऊ शकतो. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील वातावरण ढगाळच होते.
बुधवारी रात्री झालेला पाऊस (मिमी)
बारामती – 99, काटेवाडी – 32.7, कटफळ – 26, गाडीखेल – 25, सावंतवाडी- 20, नारोळी – 15, पणदरे – 15, बरहाणपूर- 14, जळगाव कडेपठार – 12, माळेगाव – 10, केव्हीके – 7.2, उंडवडी कडेपठार – 7 , वडगाव निंबाळकर – 3, मानाजीनगर -1
 
The post बारामतीला पावसाने झोडपले ! तासाभरात पडला 99 मिमी पाऊस appeared first on पुढारी.

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर व तालुक्यात बुधवारी (दि. 9) रात्री अवकाळी पाऊस झाला. विशेषतः बारामती शहरात पावसाचा जोर अधिक होता. अवघ्या तासाभरातच शहरात सुमारे 99 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहराच्या विविध भागांत पाणीच पाणी झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. चार दिवसांपूर्वी शहरात अवकाळीच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. परंतु, …

The post बारामतीला पावसाने झोडपले ! तासाभरात पडला 99 मिमी पाऊस appeared first on पुढारी.

Go to Source